शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

मुक्ताई कारखाना क्षेत्रात ऊस लागवड केल्यास अठराशेपेक्षा अधिक भाव देणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 7:54 PM

संत मुक्ताई साखर कारखाना परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात ऊस लागवड केल्यास वाहतूक बचत होऊन शेतकऱ्यांना अठराशेपेक्षा अधिक भाव देणे शक्य होईल, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.

ठळक मुद्देमाजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादनसंत मुक्ताई कारखान्यात एक लाख एक हजार एकशे एकरा क्विंटल साखरेचे पूजनआतापर्यंत एक लाख २२ हजार ३३० मेट्रिक टन ऊस गाळपकारखान्याने वीज वितरण कंपनीला निर्यात केली ३९ लाख ४९ हजार २०० कि.वॅट. वीज

मुक्ताईनगर, जि.जळगाव : संत मुक्ताई साखर कारखाना परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात ऊस लागवड केल्यास वाहतूक बचत होऊन शेतकऱ्यांना अठराशेपेक्षा अधिक भाव देणे शक्य होईल, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामातील (२०१८-१९) उत्पादित एक लाख एक हजार एकशे एकरा क्विंटल साखरेचे पूजन करताना ते बोलत होते.यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, पं.स. सदस्य विकास पाटील, राजू सवळे, चंद्रकांत भोलाणे, विनोद गवळे, संदीप देशमुख, विश्वनाथ महाजन, रामभाऊ पाटील, प्रेमचंद बढे, पांडुरंग नाफडे उपस्थित होतेया वेळी कारखाना लाभ क्षेत्रातील उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना खडसे म्हणाले, आपण सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी उसाची लागवड केल्यामुळे कारखाना यशस्वीरितीने पाचवा गळीत हंगाम पार पाडत आहे. कारखाना उसाला एफआरपीपेक्षा जास्त भाव देत आहे. चालू वर्षी कारखान्याने उसाला १८०० भाव दिला आहे. आपण जर कारखाना लाभ क्षेत्रात उसाची जास्त लागवड केली तर वाहतूक खर्चात बचत होऊन उसाला आणखी अधिक भाव देणे शक्य होईल, तेव्हा शेतकरी बांधवांनी ऊस लागवडीकडे वळावे, असे आवाहन केले.स्थानिक संचालक विलास धायडे यांनी प्रास्ताविका, ‘चालू गळीत हंगामात कारखान्याने आतापर्यंत एक लाख २२ हजार ३३० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून, एक लाख एक हजार १११ क्विंटल साखर उत्पादित केली असून, ९.०२ चा साखर उतारा आहे. कारखान्याने वीज वितरण कंपनीला एकूण ३९ लाख ४९ हजार २०० कि.वॅट. वीज निर्यात केली आहे’, असे सांगितले.कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्य अभियंता तुकाराम सुरवसे, कृषी अधिकारी मुश्ताक पटेल, रसायन विभागाचे अभियंता के.व्ही.पाटील, गोपाळ पाटील, रवीकुमार भोसले, पंकज पाटील यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMuktainagarमुक्ताईनगर