जीवनात सुरक्षिततेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्या श्रृंखलेत धर्म कसा सुरक्षित राहील, हेदेखील महत्त्वाचे आहे. धर्मरक्षणाचे महत्त्व पाहता त्याचा उल्लेख ग्रंथांमध्येही आढळतो. त्यानुसार गौतमकुलक ग्रंथात म्हटले आहे की, ‘सव्व कला धम्म कला जिणाई’ अर्थात सर्व कलेवर धर्म कला विजय प्राप्त करते. अशाच प्रकारे सर्व कथांना एक धर्म कथा विजय प्राप्त करते, सर्व शक्तींवर धर्म शक्ती विजय मिळविते, संसाराच्या सर्व सुखांवर धर्म सुख विजय प्राप्त करते. या बाबत जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी आपल्या अंतिम वाणीत उत्तराध्ययन सूत्राच्या अकराव्या अध्यायात म्हटले आहे की, ‘धर्मो रक्षती रक्षित:....’ अर्थात जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण होते. अशाच प्रकारे महाभारतात वेद व्यास यांनी म्हटले आहे की, ‘धर्म एवं हतो हन्ती, धर्म रक्षती रक्षित:...’याचा अर्थ आम्ही धर्मास सुरक्षित ठेवले तर तो आमचे संरक्षण करेल, अर्थात आम्ही धर्माचे रक्षण-पालन केले नाही तर तो आमचे अस्तित्त्व नष्ट करेल. यासाठी प्रत्येकाने धर्माच्या रहस्याला जाणावे, त्याला जीवनात उतरवावे आणि त्याचे प्रत्यक्ष संरक्षण करण्याचे प्रयत्न करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.संसारात प्र्रत्येक व्यक्ती लहानात लहान सूक्ष्म वस्तूंपासून मोठ्या वस्तू, ज्या अध:पतनाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत, त्यांना सुरक्षित ठेवत असतो. मात्र धर्म शाश्वत आहे, जीवनास उन्नत करणारा आहे, त्याला मात्र सुरक्षित ठेवत नाही.धर्म अशी वस्तू नाही की, जी कपाटात अथवा तिजोरीत सुरक्षित ठेवू शकतो. त्यासाठी धर्मास प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे, जीवनात उतरावयाचे आहे. जी व्यक्ती धर्मास आपल्या जीवनात उतरवत नाही, त्याचे रक्षण करीत नाही त्याचे जीवन निरर्थक आहे. पवित्रता, मदत, विश्वास, न्यायबुद्धी, औदार्य, एकता, दक्षता, वास्तविकता, समर्पण भावना इत्यादींच्या सुरक्षिततेसाठी धर्माच्या वेगेवगेळ््या व्याख्या आहेत.आत्म्याच्या पवित्रतेस सुरक्षित ठेवाश्री कुंदकुंदाचार्यांनी धर्माची एक छोटीसी परिभाषा मांडताना म्हटले आहे की, आपला स्वभाव हाच धर्म आहे. ज्या प्रमाणे पाण्याचा स्वभाव शीतलता, अग्नीचा स्वभाव उष्णता, साखरेचा स्वभाव स्निग्धता, गोडपणा आणि मीठाचा स्वभाव खारटपणा आहे, त्याचप्रमाणे आत्म्याचा स्वभाव ज्ञान दर्शन आणि चारित्र्यमय आहे, सत्, चित आणि आनंदमय आहे. आत्मा आपल्या शुद्ध व पवित्रमय स्वभावात राहिला तर निश्चितच धर्ममय आहे. त्यासाठी आत्म्याच्या पवित्रतेस सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.दान कार्यास सुरक्षित ठेवामदर टेरेसा, बाबा आमटे यांनी आपल्या कार्यातून दानाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यातून दीन-दु:खीतांची सेवा करण्यात मोठे पुण्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे दानाचेही महत्त्व सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. या सोबतच विश्वास, न्यायबुद्धी, दानशुरता, एकता, सावधानता, वास्तवता, समर्पण यांनाही सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.- प्रेमचंद बरडिया, निवृत्त प्राध्यापक
धर्म रक्षण कर्त्याचेच होते रक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:04 PM