"हे शेबंड्या पोरालाही पटणारं नाही"?; जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 04:39 PM2023-09-05T16:39:26+5:302023-09-05T16:59:36+5:30

मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू

"It won't suit even a scumbag boy"?; Jayant Patil's reply to Ajit Pawar | "हे शेबंड्या पोरालाही पटणारं नाही"?; जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

"हे शेबंड्या पोरालाही पटणारं नाही"?; जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

googlenewsNext

जळगाव - जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याने जनप्रक्षोभ उसळलेला आहे. दरम्यान हा बेछूट लाठीमार वरून, मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार झाल्याची शंका आहे, असा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. त्याला अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. वरून आदेश आले आहेत, असं काहीजण खुशाल सांगताहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू, राजकारण सोडून देऊ, असं आव्हान अजित पवार यांनी दिलं. त्यावर, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव येथील सभेतून प्रत्युत्तर दिलंय. 

मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू. चला दुध का दूध पाणी का पाणी. आम्ही कोणी तिघांनी आदेश दिले असतील ना, तर सिद्ध करावं. आम्ही राजकारणातून बाजूला होऊ. त्याचवेळी देवेंद्र फडणवीसांनी हात वर करुन बोट उंचावत ''एस''... म्हणत अजित पवारांचं समर्थन केलं. आता, अजित पवारांच्या विधानाचा उल्लेख करत जयंत पाटील यांनी नाव न घेता अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं. तसेच, मुख्यमंत्री आणि, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री असताना, पोलीस तुम्हाला न विचारता लाठीचार्ज करत असतील तर तुम्ही काय करता?, असा सवालही जयंत पाटील यांनी विचारला.

राज्यात तुमचं सरकार, तुम्हाला न विचारता पोलिसांकडून लाठीचार्ज होत असेल, तर सरकारमध्ये राहायचा तुम्हाला अधिकार आहे का, असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला. तुम्हाला न विचारता लाठीचार्ज करत असतील, तर मग तुम्ही काय करता. पोलीस तुम्हाला न विचारता शांततेत चाललेल्या आंदोलकांना मारहाण करत असतील तर सरकार म्हणून तुम्ही काय करता?, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच, तुमचं हे चॅलेंज म्हणजे महाराष्ट्रातील शेंबड्या पोरालाही न पटणारं आहे, असे म्हणत अजित पवार यांच्या आव्हालाना जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. 

खडसेंचा अजित पवारांना सवाल

अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सगळे अधिकार आहेत हे त्यांनी सिद्ध करुन दाखवावे. उपमुख्यमंत्री हे नामाभिधान असते, त्यांना कुठलाही विशेषाधिकार उपमुख्यमंत्री म्हणून नसतो. मग हे सांगताना मला विशेषाधिकार आहे, असा एखादा जीआर त्यांनी दाखवावा. तसं, एखाद्या ठिकाणी लाठीचार्ज करत असताना एकनाथ खडसेंनी आदेश दिला म्हणून लाठीचार्ज होईल का? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. 

मग तो वरिष्ठ कोण?

तेथील एसपींनी पहिल्याच भेटीत सांगितलं की, लाठीचार्ज करायच्या सूचना मला वरिष्ठांकडून मिळाल्या. मग हा वरिष्ठ कोण असू शकतो, त्यांच्यापेक्षा जो वरिष्ठ आहे तोच असू शकतो. एखादी घटना घडली तर त्याची अंतिमत: जबाबदारी ही गृह खात्यावर असते, गृहखात्याच्या मंत्र्यावर असते. रेल्वेचा अपघात झाला तर रेल्वेमंत्री राजीनामा, गोवारीचं हत्याकांड झालं तर मंत्र्याचा राजीनामा. मग, इथं लाठीचार्ज करण्यासाठी मी जबाबदार नाही असं म्हणण योग्य नाही, ती त्यांचीच जबाबदारी आहे. दरम्यान, मी राजीनामा मागणार नाही. कारण, मी मागितल्यावर देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील, असं वाटत नाही, असेही खडसेंनी म्हटले.
 

Web Title: "It won't suit even a scumbag boy"?; Jayant Patil's reply to Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.