भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेर्पयत खान्देशात, व:हाड व पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे भुलाबाईची स्थापना होते. महिनाभर घरात उत्साहाचे वातावरण असते. भिल्लीणीचा वेष घेऊन भिल्लरुपी शंकराला (भुलोबा) भुलवायला आलेल्या पार्वतीचे हे नाव भुलाबाई. भुलोबा- भुलाबाईची मातीची मूर्ती सजवलेल्या मखरात बसवली जाते. रोज संध्याकाळी गल्लीतल्या मुली एकमेकींच्या घरी जाऊन फेर धरुन टिप:या वाजवून गाणी म्हणतात. पहिली गं भुलाबाई, देवा देवा साजे.. या गाण्याने सुरुवात होते. महाराष्ट्रातील या परंपरेला विविध नावांनी संबोधले जाते. जसं भोंडला आणि हादगा. यातही अशीच गाणी असतात. नवरात्रात रोज भोंडला खेळला जातो. हस्त नक्षत्र असल्याने पाटावर हत्तीचे चित्र काढतात. मुली त्याची पूजा करतात. हातात हात धरून फेर धरून पाटाभोवती गाणी म्हणतात. पहिल्या दिवशी एक गाणं, दुस:या दिवशी दोन गाणी अशी गाण्यांची संख्या वाढवत नेतात. दस:याला 10 गाणी म्हणतात. गाणी म्हटल्यावर भोंडल्याची खिरापत म्हणजेच खाऊ ओळखून तो वाटला जातो. ‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा..’ या गाण्याने भोंडल्याची गाणी सुरू करतात. आपल्या घरी खूप मोठ्ठा भोंडला व्हावा म्हणून चढाओढही लागते. ‘हादगा’ हासुद्धा भोंडल्यासारखाच असतो. हस्त नक्षत्रात दिवसभर कडकडीत ऊन आणि संध्याकाळी धो धो पाऊस पडतो. असं म्हणतात की, हत्ती समुद्रावरुन सोंड भरून पाणी आणतो आणि आपल्या इथे टाकतो. पाऊस हा सर्व सृष्टीत नवचैतन्य निर्माण करतो आणि अश्विन महिन्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतो. ‘धो, धो, धो पडतील हस्ती, भरतील धान्याचा पोती’ हस्ताच्या पावसाचे असे सुंदर वर्णन या गीतात केले आहे. ‘हादगा’ म्हणजे हत्तीची केलेली पूजा. हत्तीचे चित्र बाजारात मिळते. एक हत्ती किंवा समोरासमोर तोंड करून सोंडेत माळ धरलेले हत्ती उभे असतात. असे हादग्याचे चित्र असते. याला ङोंडूची फुले वाहतात. तसंच या दिवसात मिळणा:या फळभाज्यांची माळ करून घालतात. ‘हादगा देव मी पूजिते, सख्यांना बोलवते..’ भुलाबाई महाराष्ट्रात व मध्य प्रदेशातही खेळली जाते. महिनाभर घरोघरी भुलाबाईची पूजा करतात, गाणी म्हणतात आणि खिरापत वाटतात. रोज नवनवीन खाऊ हे याचे वैशिष्टय़ असते. शेवटच्या दिवशी गाणी रात्री म्हटली जातात. ही रात्र असते कोजागिरी पौर्णिमेची. या दिवशी सगळ्याजणी एकत्र येतात. गाणी म्हणतात. 33 प्रकारचे खाऊ बनवतात. काही ठिकाणी फुलोराही करतात आणि गाणी म्हणून जागरण करतात. अशाप्रकारे हादगा, भोंडला, भुलाबाई या वेगवेगळ्या नावांनी जरी हा उत्सव होत असला तरी संस्कृती व परंपरा इ. वसा पुढील पिढीकडे संक्रमित होत असतो. आज धकाधकीच्या जीवनात आपण वेळेअभावी अनेक गोष्टी करत नाही. सोडून देतो आणि जीवनातला आनंद हरवून बसतो. परंपरा पुढे जाण्यासाठी सण, उत्सव व महोत्सव यांची गरज असते. समाजात अनेक लोक, संस्था विविध उपक्रमातून अशा परंपरा पुढे नेत आहेत. केशवस्मृती प्रतिष्ठानही गेल्या 15 वर्षापासून अत्यंत यशस्वीपणे भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करीत आहे. वय विसरून लहान मोठय़ा सर्व मैत्रिणी यात सहभागी होत आहेत. घरात, गल्लीत आता भुलाबाईची स्थापना होत आहे. गाणी म्हणायला मैत्रिणी जमत आहेत. आज सगळेच जण यात सहभागी होत आहे. जे अजून सहभागी नसतील त्यांनी सहभागी व्हावे आणि आपल्या समृध्द मौखिक परंपरेचे एक भाग व्हावे. चला तर मग सगळ्याजणी जमूयात.
जागर भुलाबाईचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 1:39 AM