लोकमत ऑनलाईन भडगाव, जि. जळगाव दि. 3 : पर्यावरणाचा समतोल राखावा यासाठी येथील जागृती मित्र मंडळाने ‘जागृती वाडी’ साकारली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारे मंडळ म्हणून ओळख असणा:या जागृती मित्र मंडळाचे यंदा 34 वे वर्ष असून, तालुक्यातील सर्वाधिक मोठे असे मंडळ म्हणून या मंडळाला नावलौकिक मिळवता आला आहे . मंडळात विद्यार्थी, शेतकरी, शिक्षक , प्राध्यापक, व्यापारी, डॉक्टर, औषधी दुकानचालक तसेच अनेक प्रतिष्ठित आहेत. या सर्वाच्या सहभागाने मागील वर्षी जागृती मित्र मंडळास महाराष्ट्र शासनाचे तालुका, जिल्हा व विभागस्तराचे प्रथम बक्षीस प्राप्त झाले होते. त्यानिमित्ताने त्यांचा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. मंडळाचे वर्षभर आदर्श असे उपक्रम सुरू असतात. पूर्वी लातूर भूकंपग्रस्तांना मदत, आसाममधील पूरग्रस्तांना व पिंपरखेड येथील आगग्रस्तांना मदत, मागील वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून नाम संस्थेस 11 हजार रुपये देणगी दिली होती. वर्षभर विद्याथ्र्यासाठी उपक्रम राबवून त्यांच्या चित्रकला, निबंध, वक्तृत्व आदी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. येथील जागृती चौकात मंडळाच्या पुढाकाराने भव्य असे गणेशाचे मंदिर साकारण्यात आले असून, मंडळाच्या वतीने उत्कृष्ट वाचनालय चालविण्यात येते.
वृक्ष लागवडीवर साकारली ‘जागृती वाडी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 2:07 AM
भडगाव येथील जागृती मित्र मंडळाच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे होतेय स्वागत
ठळक मुद्देयंदा या मंडळाने पर्यावरणाचा समतोल राखावा म्हणून वृक्ष लागवडीवर ‘जागृती वाडी’ नावाची 12 पात्रांची सजीव आरास साकारली आहे. जागृती वाडी नावाची ग्रामपंचायत गावात कसे काम करते, आज महात्मा गांधी असते तर काय म्हटले असते, यावर महात्मा गांधी उपस्थितांना पर्यावरणाचा संदेश देतात व ते ऐकून ग्रामपंचायत व जनता पर्यावरणपूरक काम करते व त्याचा फायदा सांगणारे उत्कृष्ट नाटक सादर करण्यात येत आया आदर्श अशा उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी गावातील अनेक भाविक दररोज या सजीव आरास बघण्यास गर्दी करीत आहेत.