ब:हाणपूर,दि.2-अवैधरित्या शस्त्रास्त्रांची तस्करी करणा:या महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील टोळीच्या मुसक्या आवळण्यात शाहपूर पोलिसांना यश आले आह़े 11 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक रिव्हॉल्व्हर, सहा कट्टे, एक देशी पिस्तूल, एक एअर गन, दोन भरमार, दहा आग्नेय शस्त्र जप्त करण्यात आल़े
जिल्हा पोलीस अधीक्षक मनकामना प्रसाद, उपअधीक्षक करणसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली जंबूपानी कार्यक्षेत्रातील शाहपूरजवळ ही कारवाई करण्यात आली़
11 आरोपींना अटक
या कारवाईत मुख्य आरोपी शकील अली (जंबूपानी) सह लालसिंह तेहनिया बारेला (नाचणखेडा), अहमद मोहम्मद मोहद, परमसिंह उर्फ ढेबा चैनसिंग बारेला (सांभरपूरा), युवराज उर्फ प्रधान किशन बारेला (हाथबलडी), लियाकत उर्फ जलील अकबर अली (जंबूपानी), बंशी नंदलाल बारेला (जंबूपानी), साहदा नरसिंह भिलाला (जंबूपानी), शकील उर्फ शौकत अकबर, सै़नजीर सै़गफूर (सोनाला, महाराष्ट्र), संतोष रामदास चोपडे (आकोली, महाराष्ट्र), मकसूद हुसैन अली (जंबूपानी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत़
ही कारवाई शाहपूर ठाण्याचे निरीक्षक संजय पाठक, उपनिरीक्षक देवीप्रसाद सिंह बिसेन, रामआसरे यादव, रेखा वास्के, कलीराम मौर्य, परसराम पटेल, किरण कोचूरे, अशोक चौहान, हिंमतसिंह गिरासे, भरत देशमुख, तुकाराम, संतोष, गगन, संतोष दोगुने आदींनी केली़
दरम्यान, अटकेतील आरोपी शस्त्रास्त्रांची तस्करी करून ते कुणाला विकत होते. तसेच यापूर्वी त्यांनी अशा पद्धत्तीने कुणाला शस्त्रास्त्रे विकली याची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आह़े (वार्ताहर)