जळगाव : शहरात अमृत योजनेचे काम सुरू आहे, यासाठी हजारांवर मजूर शहरात आलेले आहेत. या मजुरांना जैन महिला मंडळातर्फे मदतीचा हात देत नववर्षानिमित्त ब्लँकेट व बिस्कीट वाटप करण्यात आले.
सध्या शहरात अमृत योजनेंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर शहरात आलेले आहेत. या मजुरांचा आर्थिक भार कमी व्हावा व थंडीतही वाढ झाल्यामुळे ३०० मजुरांना मंडळाच्या वतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाच्या अनिता कांकरिया, रत्ना जैन, कमला अग्रवाल, शैला मयूर, कंचन भंसाली, उज्ज्वला मुथा, हेमा गांधी, लीलाबाई अग्रवाल, प्रेमलता डाकलिया, नीता जैन, ललिता श्रीश्रीमाळ, अनिता मेहता, अल्का कांकरिया, आशा पगारिया, सुनीता कोचर, अंजू बनवट, रत्नप्रभा अग्रवाल, भारती रायसोनी, सुधा सांखला, कल्पना कांकरिया, अनामिका कोठारी, शीतल बरडिया आदी उपस्थित होते.