सदर कुटुंबांना दरमहा पुरेल एवढे अन्नधान्य दर महिन्याच्या १५ तारखेला देण्यात येणार आहे. या महिन्यात १५ जुलै रोजी सदर कुटुंबांना अन्नधान्य देऊन या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. सदर महिलांचे पालनपोषण करणारे कुणीही नसल्याने सामाजिक दायित्व म्हणून जैन सोशल ग्रुपने ही जबाबदारी स्वीकारली आहे. या अन्नधान्य किटमध्ये तांदूळ, तूरडाळ, तेल पाऊच, गव्हाचे पीठ, साखर, लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, राई, जिरे, गरम मसाला, चहा पावडर आदी वस्तूंचा समावेश आहे. हे किट देताना ग्रुपचे अध्यक्ष राजेश बेदमुथा, सेक्रेटरी पुनम कोचर, महावीर सिंघवी, पलाश जैन, गोकुल पारख, दिनेश जैन, राजेंद्र छाजेड, रिषभ जैन, कैलाशचंद लोढ़ा व गरीब कुटुंबीय उपस्थित होते.
फोटो २२/१