ठळक मुद्देयंदा 11.4 टक्के कमी पाऊस तीन गावांचे टँकर बंद झालेपारोळा तालुक्यात आतार्पयत जिल्ह्यात सर्वाधिक 333.4 मिमी पावसाची नोंद
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26 - जिल्ह्यात गतवर्षी 25 जुलैर्पयत झालेल्या पावसाच्या तुलनेत यंदा 11.4 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जुलै संपत आला तरीही 48 गावांना 23 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आठवडाभरात पावसाने चांगली हजेरी लावल्याने तीन गावांचे टँकर बंद झाले आहेत. पारोळा तालुक्यात आतार्पयत जिल्ह्यात सर्वाधिक 333.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आठवडाभरात चांगला पाऊस झाल्याने पारोळा तालुक्यातील खेडीढोक व मंगरूळ येथील तर भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील टँकर बंद झाले आहेत. मात्र जामनेर तालुक्यात 5, बोदवड 1, मुक्ताईनगर 3, अमळनेर 14 अशा 23 टँकरद्वारे 48 गावांना पाणीपुरवठा सुरू आहे.