जळगाव : वाळू माफियांची वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील सहा ठिकाणच्या नदीपात्रात पोलिसांना उतरवून कोम्बिग आॅपरेशन राबविले. मात्र कारवाईआधीच वाळूमाफिया ‘अलर्ट’ झाले, त्यामुळे इतका मोठा ताफा रस्त्यावर असताना फक्त आठच वाळूचे ट्रॅक्टर पोलसांच्या हाती लागले. त्यामुळे एस.पींच्या यंत्रणेला वाळूमाफियांच्या खबरींची यंत्रणा भारी ठरल्याचाच प्रत्यय येत असून खाकीतील अशी मंडळी नेमकी कोण? हे शोधणेही पोलीस अधीक्षकांपुढे एक आव्हान ठरले आहे.जळगाव जिल्ह्यातील वाळू तस्करीचे जाळे मोठे आहे. गिरणा नदीपात्रातील वाळूला तर राज्यातून मागणी असते. दरवर्षी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुमारे ४० वाळू गट निश्चित करून त्यांचा लिलाव केला जात असतो. वाळू लिलावातून मिळणारा महसूल पूर्वी ५० कोटींच्या वर असायचा. मात्र यावर शक्कल लढवत वाळू माफियांनी लिलावात भागच न घेता यंत्रणांना हाताशी धरून तस्करी करण्याची शक्कल लढविली. बऱ्याच ठिकाणी ती यशस्वीही झाली आहे. आता तर नदी पात्रातून वाळू उपसा करण्यास कुणालाही परवानगी नाही, कारण ठेक्यांची मुदतही कधीच संपलेली आहे. तरीही सर्रास वाळू उपसा सुरू असतो.आॅपरेशन ‘वाळू तस्कर’चोरट्या वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस नियंत्रण कक्षातून सर्व प्रभारी अधिकाºयांना कारवाईसाठी पथके तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वाळूंशी किंवा माफियांशी जवळीक असलेल्या यंत्रणेपर्यंत कारवाई आधी निरोप पोहचणे हे अपेक्षितच होते. याबाबत आपण गाफिल नव्हतोच अशी कबुली देत फुटीरवाद्यांचा यानिमित्तानेच शोध घेता येणार असल्याचे सांगून त्यांनी खात्यातील फुटीरवाद्यांवर भविष्यात कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. पोलीस अधीक्षकांच्या अंदाजानुसार आॅपरेशन ‘वाळू तस्कर’ ची खबर लीक झालीच असल्याचे पोलीस अधीक्षकांच्याही लक्षात आले आहे.जिल्ह्यातील गिरणा, तापी, वाघुर, तितुर, पांझरा व पुरनाड आदी सहा ठिकाणी शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंत एकाचवेळी कारवाईची मोहीम राबविण्यात आली. त्यात पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह ५० अधिकारी व ७०० कर्मचारी सहभागी झाले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात कोम्बिंग राबविल्यावरही फक्त आठच ट्रॅक्टर आढळून आल्याने त्याची कारणे शोधायला शिंदे यांनी सुरुवात केली आहे. वाळूमाफियांची यंत्रणा कशी, त्यांचे खबरे कोण... त्यांच्या संपर्कात कोण हे खबरे खाकीतील नेमक्या कोणाच्या संपर्कात आहेत. वाळू कोठून व कोणत्या मार्गाने आणली जाते, कोठे साठा केला जातो याची इत्यंभूत माहिती काढायला सुरुवात केली आहे.माफियांचीही स्वत:ची यंत्रणाजिल्ह्यात कोठेही अधिकृतपणे वाळूचा ठेका दिलेला नाही. जो दिलेला होता, त्याची मुदत ३० सप्टेबर २०१८ रोजीच संपलेली आहे. त्यामुळे वाळूचा व्यवसाय करताना माफियांनीदेखील स्वत:ची यंत्रणा उभी केली आहे. कोणता पोलीस अधिकारी किंवा महसूलचा अधिकारी कारवाईसाठी बाहेर पडणार आहे, केव्हा जाणार, सोबत कोण असणार यावर लक्ष ही यंत्रणा लक्ष ठेवत असते. एवढेच नव्हे तर अधिकाºयांची वाहने निघाली की त्यांचाही पाठलाग करून ते नेमके कोठे जातात यावरही नजर ठेवली जात असते. काही महसूल व पोलिसामधील कर्मचारी वाळूच्या व्यवसायात असल्याचे बोलले जाते. त्यांचाही शोध घेतला जात असून काही नावे निष्पन्नही झाल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे वाळू व्यवसायातील व त्यांच्याशी संबंध ठेवणारे कर्मचारी आता एस.पींच्या रडारवर आहेत.
जळगावात पोलीस अधीक्षकांच्या यंत्रणेला वाळूमाफियांचे खबरे भारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 5:48 PM
वाळू माफियांची वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील सहा ठिकाणच्या नदीपात्रात पोलिसांना उतरवून कोम्बिग आॅपरेशन राबविले. मात्र कारवाईआधीच वाळूमाफिया ‘अलर्ट’ झाले, त्यामुळे इतका मोठा ताफा रस्त्यावर असताना फक्त आठच वाळूचे ट्रॅक्टर पोलसांच्या हाती लागले. त्यामुळे एस.पींच्या यंत्रणेला वाळूमाफियांच्या खबरींची यंत्रणा भारी ठरल्याचाच प्रत्यय येत असून खाकीतील अशी मंडळी नेमकी कोण? हे शोधणेही पोलीस अधीक्षकांपुढे एक आव्हान ठरले आहे.
ठळक मुद्देजळगावात खाकीतील फुटीरवादी रडारवर‘महसूल’चे ही पितळ पडणार उघडेकोम्बिंग आॅपरेशन दरम्यान केवळ ८ वाहनांवर कारवाई