कुंदन पाटीलजळगाव: रामायणकर वाल्मिक ऋषींच्या पावन वास्तव्याने पुनित श्री.क्षेत्र वालझिरीसह पांडवांच्या वास्तव्य लाभलेले पाच पांडव मंदिरासाठी अनुक्रमे एक कोटी व ५० लाखांचा निधी प्रादेशिक पर्यटन विकास विभागाकडून उपलब्ध झाला आहे.
यापूर्वी जळगाव लोकसभस मतदारसंघात श्रीक्षेत्र वटेश्वर आश्रम वडगाव लांबे, श्रीक्षेत्र बगळीदेवी मंदिर सायगाव, श्रीक्षेत्र सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडी, श्री क्षेत्र ऋषीपांथा बहाळ तसेच कला महर्षी के की मूस कलादालन या क्षेत्रांसाठी तत्कालीन आमदार उन्मेश पाटील यांनी निधी उपलब्ध केला होता.
या क्षेत्रांसाठी निधीश्री.क्षेत्र वालझिरी ता.चाळीसगाव येथे तीर्थक्षेत्राचा पर्यटन निधीतून विकासासाठी १ कोटी, चाळीसगाव येथील रेणुका माता मंदिर चाळीसगाव मंदिरासाठी १५ लाख, चाळीसगाव येथील गणेश मंदिरासाठी १० लाख, कराडी ता. पारोळा येथील खंडेराव महाराज मंदिरासाठी १ कोटी , तसेच दरेगाव ता. चाळीसगाव येथील धनाई पुनाई माता मंदिरासाठी ३० लाख, बोळे ता.पारोळा येथील खंडेराव मंदिरासाठी १ कोटी, टिटवी ता. पारोळा येथील श्री.क्षेत्र पाच पांडव मंदिरासाठी ५० लाख, गिरड ता. भडगाव येथील श्री.क्षेत्र चतुर्भुज नारायण मंदिरासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.