जळगाव : जळगाव व भुसावळ तालुक्यात आॅनलाईन धान्य वितरणाचे प्रमाण सर्वात कमी असल्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवार, २ आॅक्टोबर रोजी शहरातील ७ रेशन दुकानांची तपासणी केली. त्यात एका दुकानात ३० क्विंटल धान्याची तफावत आढळून आल्याने ते दुकान सील करण्यात आले. तर अन्य दोन दुकानदार तपासणीच्या भितीने पळून गेल्याने त्या दुकानांनाही सील करण्यात आले. या कारवाईमुळे रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.दुकानदारांकडून होतेय टाळाटाळपॉस मशिनचा वापर करून आॅनलाईन प्रणालीद्वारे धान्य वितरण केल्यास ते खºया लाभार्थीलाच मिळते. त्यात गडबड करण्यास वाव नसल्याने रेशन दुकानदारांचा सुरूवातीपासूनच या पॉस मशिनला विरोध आहे. त्यासाठी वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. आता आधार सिडींगच झालेले नसल्याचे सांगत व आधार सिडींग करून घेण्याचे टाळत परस्पर धान्य वितरण करण्याचे प्रकार रेशन दुकानदारांकडून सुरू आहेत.आॅनलाईन कमी वितरण असल्याने तपासणीआॅनलाईन वितरणाचे प्रमाण सर्व तालुक्यांमध्ये ८० ते ९० टक्क्यांच्या आसपास असताना जळगाव तालुक्यात मात्र ते प्रमाण ६२ टक्के तर भुसावळ तालुक्यात ५५ टक्के इतके कमी आहे. म्हणजेच आॅनलाईन वितरणाला फाटा देण्यात जळगाव व भुसावळ तालुका आघाडीवर आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी या तालुक्यांमधील सर्वात कमी आॅनलाईन वितरण असलेल्या दुकानांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
जळगावात ७ पैकी ३ स्वस्त धान्य दुकानांना सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 1:28 PM
तपासणीच्या भिती पोटी दोन दुकानदार पसार
ठळक मुद्दे ३० क्विंटल धान्याची आढळली तफावतदुकानदारांकडून होतेय टाळाटाळ