- संजय पाटील
जळगाव - अक्षय राजू भिल (२२) याच्या खुनाच्या निषेधार्थ २५ रोजी अमळनेरमधील महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको करणाऱ्या २६ जणांसह अज्ञात १५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामान्य जनतेला वेठीस धरणे, अश्लील शिवीगाळ यासह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, दंगल ,सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी हा गुन्हा आहे.
अक्षय भिल याच्या खुनाच्या निषेधार्थ भिल्ल समाजाने मंगळवारी दुपारी महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको करून किरकोळ दगडफेक केली. तसेच टायर जाळले आणि सामान्य नागरिकांना दादागिरी करून त्यांचे रस्ते अडवले. यामुळे अनेकांना त्रास झाला. पोलिसांची गाडी देखील आंदोलनकर्त्यांनी अडवली होती. आंदोलनात धुळे ,शिंदखेडा ,पारोळा ,चाळीसगाव , अमळनेर ग्रामीण भागातून देखील भिल समाज एकत्र झाला होता. महिलांचाही मोठ्या सहभाग होता. त्यामुळे पोलीस नाईक दीपक माळी यांनी फिर्याद दिली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी हे करीत आहेत.