- सुनील पाटील
जळगाव - सरदार वल्लभभाई पटेल नसते तर आजचा भारत देश निर्माण झाला नसता. पटेलांनी देशाच्या दुश्मनाला, निजामाला गुडघे टेकायला लावले. जुनागडच्या राजाला गुडघे टेकायला लावले. नंतर तो पाकिस्तानात सामील झाला. पटेलांचे एक वाक्य आहे, आमच्या अंगावर याल तर तलवारीला तलवार भिडेल. सरदार पटेल हे तेव्हाच्या भाजप विषयी म्हणजे आरएसएसविषयी बोलले होते. पटेलांच्या त्याच भूमिकेनुसार जळगावात शिवसेना काम करेल असे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
सरदार पटेलांनी पोलादी पुरुष आणि पोलादी छाती काय असते हे दाखवून दिले. उध्दव ठाकरे यांनीही पोलादी पुरुष आणि पोलादी छाती काय आहे हे देशाला दाखवले. कितीही संकटे येऊ द्या. आम्ही देशाच्या, महाराष्ट्राच्या दुश्मनांशी लढत राहू. पटेलांच्या पुतळ्याचे उद्घाटन आपल्याकडून होऊ नये म्हणून अनेक अडथळे आणण्यात आले. पण त्या महान पटेलांचीच इच्छा होती. या प्रखर राष्ट्रभक्त पोलादी छातीच्या नेत्याकडून व्हायला हवे. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व संजय सावंत यांनी हा कार्यक्रम ताकदीने पुढे नेला. ही शिवसेनेची खरी ताकद जळगावकरांना दाखवली. पटेलांचा विचार राष्ट्रभक्तीचा, अखंड भारताचा विचार होता. या पटेलांनी देशाच्या दुश्मनाला, निजामाला गुडघे टेकायला लावले. सरदार पटेलांचा हा पुतळा जळगाव शहरात प्रेरणा देत राहिल. पटेलांच्या त्याच भूमिकेतून जळगावात शिवसेना काम करेल. आले किती, गेले किती, संपला भरारा..शिवसेना पक्ष प्रमुखांचा दरारा जळगावकरांनी दाखवून दिला.