जळगाव : रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण करुन त्याच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या शेख इम्रान दस्तगीर (वय २१, रा.गेंदालाल मील, जळगाव) व खलील सुपडू शिकलीकर (रा.कानळदा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी सुभाष चौक परिसरातून अटक केली. दोन्ही जण रथ पाहण्यासाठी शहरात आले होते.दर्शन भारत ससाणे (वय १६, रा. राधाकृष्ण नगर, जळगाव) हा विद्यार्थी २५ जुलै रोजी दूध फेडरेशन रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या मागील रस्त्यावरुन पायी जात असताना रात्री ११.१५ वाजता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी दर्शनला मारहाण करुन त्याच्याजवळील मोबाईल हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असतानाच शेख इम्रान दस्तगीर व खलील सुपडू शिकलीकर या दोघांनी हा मोबाईल लांबविल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले होते. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी या दोघांच्या शोधार्थ सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, विजय पाटील, अनिल इंगळे, संतोष मायकल, रमेश चौधरी, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, दादाभाऊ पाटील व प्रकाश महाजन यांचे पथक नियुक्ती केले होते. हे दोन्ही जण रथ पाहण्यासाठी असल्याची माहिंती मिळाल्याने पथकाने सुभाष चौकात दोघांच्या मुसक्या आवळल्या.एक रिक्षा चालक तर दुसरा मेकॅनिकया गुन्ह्यातील आरोपी शेख इम्रान हा रिक्षा चालक असून टॉवर चौक ते ममुराबाद या मार्गावर प्रवासी वाहतूक करतो. तर खलील हा रिक्षा मेकॅनिक आहे. सध्या तो आयटीआयमध्ये फिटर या ट्रेडचे प्रशिक्षण घेत आहे. दोघांना सायंकाळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
जळगावात जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना रथोत्सवात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 1:05 PM
तीन महिन्यापासून होते फरार
ठळक मुद्देएलसीबीची कारवाई एक रिक्षा चालक तर दुसरा मेकॅनिक