जळगाव : पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सोमवारी जिल्ह्यातील पाच पोलिसांवर कारवाई केली. त्यात बाजार पेठ पोलीस स्टेशनचे योगेश माळी, शशिकांत तायडे व मुख्यालयातील कुणाल सोनवणे यांना निलंबित तर शनी पेठचे अनिल धांडे व रवींद्र गुरचळ या दोघांना मुख्यालयात जमा करण्यात आले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बाजार पेठ पोलीस स्टेशनचे योगेश माळी, शशिकांत तायडे या दोघांनी भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष नईम पठाण यांचा मुलगा जुबेर खान पठाण याला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी रविवारी दोन्ही पोलिसांविरुध्द गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली होती.मुख्यालयातील कुणाल विठ्ठल सोनवणे याने मित्रांसह नांदुरा येथे तरुणाला रिव्हॉल्वर लावून मारहाण करुन लुटले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणाल यालाही अटक करण्यात आली होती. कुणाला हा देखील भुसावळचाच रहिवाशी असून मुख्यालयात नियुक्तीला आहे. नांदुरा पोलिसांनी तसेच मुख्यालयाच्या निरीक्षकांनी कुणाल याचा कसुरी अहवाल पाठविला होता. दरम्यान, अवैध धंदे सुरु ठेवणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. नीलाभ रोहन यांनी उपविभागातील काही अधिकाऱ्यांना नोटीसाही बजावल्या आहेत, मात्र तरीही सुधारणा न झाल्याने या अधिकाºयांचीच उचलबांगडी होण्याचे संकेत आहेत.शनी पेठच्या दोघांना अवैध धंदे भोवलेशनी पेठ पोलीस स्टेशनचे अनिल विश्वनाथ धांडे व रवींद्र एकनाथ गुरचळ या दोघांना अवैध धंदे भोवले आहेत. वारंवार सूचना देऊनही अवैध धंदे सुरु ठेवण्यास धंदे चालकांना पाठबळ दिले म्हणून सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी दोघांचा कसुरी अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. त्यावर डॉ.उगले यांनी सोमवारी दोन्ही कर्मचाºयांची मुख्यालयात बदली केली. दरम्यान, अवैध धंद्यामुळे कर्मचाºयांवर कारवाई झाल्याने अन्य पोलिसांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारीही रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जळगाव येथे एकाच दिवशी पाच पोलिसांवर कारवाई, तीन निलंबित तर दोघं मुख्यालयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:41 PM