जळगाव : संरक्षण भिंतीच्या मागणीसाठी आडत असोसिएशनने बंद पुकारल्यामुळे गेल्या वीस दिवसांपासून ठप्प असलेले बाजार समितीचे कामकाज सोमवारी पूर्वपदावर आले. अनेक दिवसांनी व्यवहार सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी २५० ते २७० क्विंटल पर्यंतच्या मालाचा लिलाव करण्यात आला़ येत्या दोन ते तीन दिवसातच कुंपणाचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा सभापतींनी केला आहे़गेल्या महिन्यात पहाटे बाजार समितीची संरक्षण भिंत पाडण्यात आली होती. त्यावरुन व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन असा वाद निर्माण झाला होता. बाजार समिती ठप्प झाल्याने शेतकरीही अडचणीत आलेले होते़व्यापाऱ्यांच्या मालाच्या सुरक्षेसाठी अखेर पत्र्याच्या कुंपणाचे काम विकासकांनी हाती घेतले आहे़ त्या पार्श्वभूमीवर सध्या बाजार समितीच्या संरक्षण भिंतीच्या जागी लोखंडी अँगल टाकण्यात आले आहे़ यावर पत्रे टाकूण तात्पुरत्या स्वरूपात कुंपण करण्यात येणार आहे़ हे काम आगामी आठ दिवसात झाले नाही तर आम्ही पुन्हा बंद पुकारू असा इशारा आडत असोसिएशनने दिला आहे.येत्या दोन ते तीन दिवसातच काम पूर्ण होईल, अशी माहिती सभापती कैलास चौधरी यांनी दिली. दरम्यान, मुळात व्यवहार ठप्प न नव्हतेच. बंद काळातही व्यवहार सुरूच होते, असा दावाही सभापतींनी केला आहे़ दरम्यान, व्यापारी संकुलाबाबत सुरु असलेला वाद संपुष्टात येण्याची शक्यता या निमित्ताने व्यक्त होत आहे.बंद मागे घेण्यात आल्यानंतर पहिल्या दिवशी सुमारे २८८ दुकाने सुरळीत सुरू झालेली आहेत़ सोमवारी ज्वारी, दादर, चना, मका, गहू, बाजरी, उदीड या मालाची सुमारे २५० क्ंिवटल पर्यंत लिलाव झाला़ खरेदी व विक्रेते दोघांमध्ये पहिल्या दिवस असल्याने उत्साह होता़व्यापाऱ्यांचा विरोध मावळलाव्यापाºयांचा संकुलाला ज्या तीव्रतेने विरोध होता, तो विरोध कालांतराने कमी होत होत अखेर आमच्या मालाच्या संरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्यास आम्ही बंद मागे घेऊ अशी भूमिका व्यापाºयांनी घेतली़ बाजार समितीला दिलेल्या पत्रातही त्यांनी व्यापारी संकुलालाला विरोध नसल्याचे म्हटले आहे, कदाचित हीच भूमिका त्यांनी आधी मांडली असती तर खूप दिवसांआधीच संरक्षण भिंतीचा प्रश्न मिटला असता, असे संचालकांमधून बोलले जात आहे़
वीस दिवसांनी जळगाव कृषी बाजार समिती पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:05 PM