शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
3
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
4
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
5
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
6
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
8
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
9
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
10
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
11
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
12
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
13
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
14
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
15
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
16
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
17
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
18
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
19
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

Jalgaon: कृषी केंद्र चालकांची मागणी, सदोष बियाण्यांसाठी कंपन्यांना पकडा..!

By अमित महाबळ | Published: November 04, 2023 7:03 PM

Jalgaon: राज्य शासनाच्या प्रस्तावित कृषी कायदा विधेयकातील जाचक तरतुदींचा जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी शनिवारी, सभा घेऊन निषेध व्यक्त केला. सदोष बियाण्यांसाठी उत्पादक कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, केंद्र चालकांच्या विरोधातील अन्यायकारक तरतुदी सरकारने विधेयकातून मागे घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

- अमित महाबळजळगाव : राज्य शासनाच्या प्रस्तावित कृषी कायदा विधेयकातील जाचक तरतुदींचा जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी शनिवारी, सभा घेऊन निषेध व्यक्त केला. सदोष बियाण्यांसाठी उत्पादक कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, केंद्र चालकांच्या विरोधातील अन्यायकारक तरतुदी सरकारने विधेयकातून मागे घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनच्या (माफदा) वतीने राज्य सरकारच्या प्रस्तावित कृषी कायद्यातील तरतुदींविरोधात बंद पुकारण्यात आला आहे. त्याचा शनिवारी तिसरा दिवस होता. या अंतर्गत जळगावच्या जुने बी. जे. मार्केटमध्ये जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांची सभा झाली.

माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ-पाटील यांनी प्रस्तावित कायद्यात कृषी केंद्र चालकांनी सदोष बियाण्यांसाठी नुकसान भरपाई द्यायची असून, एमपीडीए कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई आदी तरतुदी अन्यायकारक असल्याचे सांगितले. विक्रेत्यांनी नुकसान भरपाई द्यायची तर त्यांना घर विकावे लागेल. या तरतुदी सरकारने मागे घ्याव्यात. सदोष उत्पादनांसाठी उत्पादक कंपन्यांकडून नुकसान भरपाई वसूल करावी. आमचा त्याला पाठिंबा आहे, अशी मागणी विनोद तराळ-पाटील यांनी केली.

कृषी केंद्र चालकांच्या विरोधानंतरही अन्यायकारक तरतुदी लागू करण्याचा प्रयत्न झाल्यास कृषी केंद्र चालक बेमुदत संपावर जातील, असा इशारा देण्यात आला. माफदाचे संचालक राजेंद्र पाटील, जळगाव जिल्हा कृषी विक्रेता संघाचे सचिव कैलास मालू, किरण नेहते, उदय झंवर, सुनील कोंडे, मनोज वायकोळे, जितेंद्र चोपडे, नेमीचंद जैन, डॉ. पोरवाल, राजू बोथरा यांच्या संघटनेचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी भेट घेतली...पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कृषी केंद्र चालकांशी संवाद साधला. सरकारला शेतकऱ्यांचेही ऐकावे लागेल. मात्र, कायद्यातील तरतुदींमुळे कृषी केंद्रचालकांना जेलमध्ये जावे लागेल, असे काही होणार नाही असे सांगत आंदोलकांना आश्वस्त केले. हिवाळी अधिवेशनात पूर्ण एक दिवस प्रस्तावित विधेयकावर चर्चा होणार आहे.

शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावले...मंगळवारी, मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक आहे. या दिवशी शिष्टमंडळ घेऊन मुंबईला येण्याचे निमंत्रण पालकमंत्र्यांकडून मिळाले आहे. प्रस्तावित कायद्यासाठी नियुक्त समिती, मंत्री यांच्यासमोर चर्चा घडवून आणू. या कायद्यामुळे कृषी केंद्रचालकांच्या हिताला बाधा होणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे, अशी माहिती विनोद तराळ-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

म्हणून नाराजीचा सूर...बीजांकुर झाले नाही, तर शेतकऱ्यांना विक्रेत्याकडून नुकसानभरपाई वसूल करता येणार आहे. यामुळे उत्पादकांच्या ऐवजी विक्रेते अडचणीत येतील. या कायद्याचा दुरुपयोग होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे नाराजीचा सूर असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रJalgaonजळगाव