जळगाव : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वच उमेदवारांसह ‘नोटा’ला किती मते मिळाली हे स्पष्ट झाले असून जळगाव शहराचा विचार केला तर शहरातील सर्वच नगरसेवकांच्या प्रभागातून राष्ट्रवादीपेक्षा भाजपलाच मोठ्या फरकाने मते मिळाल्याचे आकडेवरून दिसून येते. शहरातून झालेल्या एकूण मतदानापैकी ६६ टक्के मतदान भाजप उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांना तर २९ टक्के मतदान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना मिळाले आहे. या सोबतच १२७६ जणांनी ‘नोटा’ला मतदान केले आहे. हे प्रमाण एकूण मतदानाच्या ०.६६ टक्के आहे.लोकसभा निवडणुकीसाठी युती व आघाडी झाल्यानंतर शहरातील जवळपास सर्वच नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातून अधिकाधिक मताधिक्य देण्यासाठी कंबर कसली.यात शहरात भाजपच्याच नगरसेवकांची संख्या ५७ अर्थात सर्वाधिक असल्याने व युती झाल्याने शिवसेनेच्या १५ नगरसवेकांच्याही प्रभागातून भाजपच्याच उमेदवाराला जास्त मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते.भाजप गटनेत्यांच्या प्रभागात १० पटचा फरकमनपातील भाजप गटनेता भगत बालाणी यांच्या प्रभागातील सिंधी कॉलनी, नवी व जुनी जोशी कॉलनी, सम्राट कॉलनी, संजय गांंधी नगर, कासमवाडी, सालारनगर, ढाकेवाडी, ईश्वर कॉलनी, रचना कॉलनी या भागातील बुथवर झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादीपेक्षा भाजपला पाच ते १० पटीने अधिक मतदान मिळाले आहे.यात सिंधी कॉलनीतील बुथ क्रमांक २७८ वर गुलाबराव देवकर यांना ७४ मते तर उन्मेष पाटील यांना ७३४ मते मिळाली आहे. अशाच प्रकारे इतरही बुथवरील स्थिती असून सर्वच प्रभागातील कमळ फुलल्याचे दिसून येते.९५ टक्के मते भाजपलानगरसेवक कैलास सोनवणे यांच्या रिधूरवाडा, बालाजीपेठ, शनिपेठ या भागातूनही भाजप उमेदवारास अधिक मतदान झाल्याचे दिसून येते. यात एकाच बुथवरील आकडेवारी पाहिली तर भाजपला ७१६ मते मिळाली आहे तर केवळ ७३ मते राष्ट्रवादीला मिळाली आहे. जवळपास ९३ ते ९५ टक्के मते भाजपला आहे. अशीच स्थिती इतरही बुथवरील आहे.महापौरांच्या वार्डातून चार ते पाच पटीचा फरकमहापौर सीमा भोळे यांच्या प्रभागत येणाऱ्या रिंगरोड परिसरातील बुथवरील आकडेवारी पाहिली असता येथेही भाजप उमेदवाराला आघाडी आहे. एका बुथवर भाजपच्या उमेदवाराला २२३ तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ ६८ मते मिळाली आहे.स्थायी समिती सभापतींच्या प्रभागातून ८० टक्के मते भाजपलास्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांच्या प्रभागातील महाबळ, नेहरु नगर, मोहन नगर, आदर्शनगर, समतानगर इत्यादी भागातून झालेल्या मतदानापैकी ८० टक्के मते भाजपला मिळाली आहेत. एकाच बुथवर ३४० मते भाजपला तर राष्ट्रवादीला केवळ १०९ मते मिळाली आहेत. अशाच प्रकारे इतरही नगरसवेकांच्या प्रभागातील स्थिती आहे.विरोधी पक्षनेत्याच्याही प्रभागातून मताधिक्यमनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या तांबापुरा, मेहरुण परिसरातूनही भाजपला मताधिक्य मिळाले आहे. एरव्ही मनपातील सत्ताधारी भाजपला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणाºया शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत युतीमुळे भाजप उमेदवाराला मताधिक्य दिल्याचे दिसून येते. सुनील महाजन यांच्या प्रभागातून झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता राष्ट्रवादीपेक्षा भाजपला १० ते १५ टक्के मते मिळाली आहेत. मेहरुण मधील एकाच मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराला ५३४ मते तर राष्ट्रवादीला केवळ ४७ मते मिळाली आहेत.माजी महापौरांनीही दिले मताधिक्यमाजी महापौर ललित कोल्हे यांच्या रामानंद नगर, यशवंतनगर, विद्युत कॉलनी इत्यादी भागातूनदेखील भाजपला मताधिक्य मिळाले आहे. येथेही राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपला पाच ते सहापटीने मते मिळाली आहेत. यात एकाच बुथवर भाजपला ५८४ तर राष्ट्रवादीला ७९ मते मिळाली आहेत. या प्रभागातील सर्वच बुथवरील थोड्या फार फरकाने अशीच स्थिती आहे.
जळगावात सर्वच नगरसेवकांच्या प्रभागातून फुलले ‘कमळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:04 PM