Jalgaon: शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटलांचे पुत्र अमोल पाटलांचा बाजार समिती निवडणुकीत दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 12:35 PM2023-04-29T12:35:08+5:302023-04-29T12:36:19+5:30

Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांचे पुत्र अमोल पाटील यांचा धक्कादायक पराभव झालाय. अमोल पाटील हे बाजार समितीचे विद्यमान सभापती होते. 

Jalgaon: Amol Patil, son of Shinde's Shiv Sena MLA Chimanrao Patil, suffered a crushing defeat in the market committee elections. | Jalgaon: शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटलांचे पुत्र अमोल पाटलांचा बाजार समिती निवडणुकीत दारुण पराभव

Jalgaon: शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटलांचे पुत्र अमोल पाटलांचा बाजार समिती निवडणुकीत दारुण पराभव

googlenewsNext

- प्रशांत भदाणे

-जळगाव -  जिल्ह्यातील पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांचे पुत्र अमोल पाटील यांचा धक्कादायक पराभव झालाय. अमोल पाटील हे बाजार समितीचे विद्यमान सभापती होते. 

राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या मार्केट बचाव पॅनलने आमदार चिमणराव पाटील यांच्या किसान पॅनलचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता मिळवली आहे . ही निवडणूक सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीची ठरली होती, कारण राष्ट्रवादीचे नेते सतीश पाटील आणि त्यांच्या पत्नी रेखा पाटील यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले होते, मात्र सतीश पाटलांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर दोघांची उमेदवारी वैध ठरली होती. आमदार चिमणराव पाटील यांच्या पुत्राचा 35 मतांनी धक्कादायकरित्या पराभव झाल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठी चपराक मानली जात आहे. डॉ. सतीश पाटील यांनी करिष्मा दाखवत पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता परिवर्तन घडवून आणले

Web Title: Jalgaon: Amol Patil, son of Shinde's Shiv Sena MLA Chimanrao Patil, suffered a crushing defeat in the market committee elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.