आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२५ : शहरातील उस्मानिया पार्क व चोपडा येथे घरफोडी करणारा सुनील अमरसिंग बारेला (वय २० रा.गौºयापाडा, ता.चोपडा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी गजाआड केले. त्याच्याकडून एक महागडा मोबाईल व जळगावातून चोरलेले १२ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. दरम्यान, अट्टल चोरटा पकडल्याचे समजल्यानंतर चोपडा येथील उपअधीक्षक सदाशिव वाघमारे हे देखील शनिवारी जळगावात दाखल झाले होते.
उस्मानिया पार्क चोरीउस्मानिया पार्कमध्ये २७ जून रोजी पहाटे साडे पाच वाजता शेख शकील शेख इब्राहीम, शेख नाजीम शेख सुपडू, झयान शेख मुस्ताक व सलीम खान मुसाखान या चौघांच्या घरातून एकाच वेळी महागडे मोबाईल व काही रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. चोपडा शहरातही अशाच प्रकारे चो-या झाल्या होत्या. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. मालमत्तेच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकातील सहायक निरीक्षक सागर शिंपी, सहायक फौजदार मनोहर देशमुख, उत्तमसिंग पाटील, रवींद्र गायकवाड, विजय पाटील, नारायण पाटील, महेंद्र पाटील, बापु पाटील, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, रामकृष्ण पाटील, सुशील पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने, महेश पाटील, गफूर तडवी व नरेंद्र वारुळे यांच्या पथकाने केलेल्या तपासात सुनील बारेला हा आरोपी निष्पन्न झाला. त्याची चौकशी केली असता त्याने दोन्ही ठिकाणच्या चोरीची कबुली देत मुद्देमालही काढून दिला.