मनोज जोशीपहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम थंड बस्त्यात असल्याने वाकोद-पहूर दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. त्यामुळे चिखलात रस्ता की रस्त्यावर चिखल हेच कळत नसल्याने वाहने फसत आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनधारक व प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.सध्या सुरू असलेल्या पावसाने जळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या काम थंडबस्त्यात पडले आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद अवस्थेत आहे. पहूर वाकोद दरम्यान रस्त्यात मोठमोठी खड्डे असल्याने त्यात चिखल झाला आहे. येणाऱ्या जाणाºया वाहनांना शुक्रवारी शनिवारी याचा फटका बसला आहे. वाहने चिखलात फसल्याने दीडतास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे विद्यार्थी, रुग्ण, सरकारी नोकर, प्रवाशासह वाहनधारकांची गैरसोय पहावयास मिळत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
जळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग चिखलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 4:07 PM
जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम थंड बस्त्यात असल्याने वाकोद-पहूर दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. त्यामुळे चिखलात रस्ता की रस्त्यावर चिखल हेच कळत नसल्याने वाहने फसत आहेत.
ठळक मुद्देपहूर-वाकोद दरम्यान वाहने फसलीदीडतास वाहनांच्या रांगा