भुसावळचे नवीन डीआरएम रामकुमार यादव : रेल्वेच्या सेफ्टीला सर्वाधिक प्राधान्य ऑनलाईन लोकमत/पंढरीनाथ गवळी भुसावळ, जि. जळगाव, दि. 17 - प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असून त्यासाठी काम करताना सर्वाधिक प्राधान्य रेल्वेच्या सेफ्टीला (सुरक्षा) दिले जाईल व त्याची प्रभावी अंमलबजावणीही करण्यात येईल. तसेच मध्य रेल्वेतील अत्यंत महत्त्वाचा असा भुसावळ-जळगाव हा 25 कि.मी.अंतराचा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग वेळेत बांधून पूर्ण होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे नवीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) रामकुमार यादव यांनी ‘लोकमत’ला विशेष मुलाखत देताना दिली.रामकुमार यादव यांनी सोमवारी भुसावळ रेल्वे विभागाचे नवीन डीआरएम म्हणून सुधीरकुमार गुप्ता यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर ‘लोकमत’ने त्यांच्याशी त्यांच्या दालनात संवाद साधला. त्या वेळी त्यांच्याशी झालेला संवाद.. वेळ व सुरक्षेला प्राधान्य प्रवासी गाडय़ा वेळेवर (पंक्च्युलिटी) धावणे यासह रेल्वेची संरक्षा याला विशेष प्राधान्यक्रम राहील. त्यासाठी सतत प्रय} केले जातील, असे यादव यांनी सांगितले. चांगल्या आरोग्य सोयीसाठी प्रयत्न भुसावळातील दवाखान्यात नेमक्या काय त्रुटी आहेत. त्याची आधी माहिती घेतली जाईल. नेमका काय प्रकार ते जाणून घेतल्यानंतर कर्मचा:यांना चांगल्या आरोग्य सोयी देण्याबाबत प्रय} केले जातील.भुसावळ-जळगाव मार्गासाठी प्रयत्नभुसावळ-जळगाव हा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग खरोखरच एक मोठे आव्हान आहे. ते मी मानतो, मात्र हे दोन्ही मार्ग वेळेत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यासाठी कसोसिने प्रय} केले जातील. ही एका काळासाठीची निरंतर प्रक्रिया आहे. जळगाव-मनमाड तिस:या रेल्वे मार्गाचेही आव्हान जळगाव-मनमाड या तिस:या रेल्वे मार्गाचेही आव्हान आहेच. मात्र त्याला वेळ आहे. या मार्गाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या मार्गाच्या आधी जळगाव-उधना हा रेल्वे मार्ग बांधून तयार होईल.प्रवाशांच्या सोयीकडेही लक्षरेल्वे प्रवासी गाडय़ा वेळेवर (पंक्च्युलिटी) धावणे यासह प्रवासी सोयी, कर्मचा:यांचे हित, सुरक्षा या बाबींकडे आपले लक्ष राहील,असे यादव म्हणाले.
जळगाव-भुसावळ तिसरा व चौथा रेल्वे मार्ग वेळेत होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2017 4:06 PM