शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

जळगावात भाजपाने उमेदवारीबाबत गाफील ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 2:09 PM

आयात उमेदवारांमुळे भाजपात मोठ्या प्रमाणावर नाराजी असून नगरसेविका जयश्री नितीन पाटील व भाजयुमोचे सदस्य संग्रामसिंग सुरेशसिंग सूर्यवंशी यांनी बंडखोरी केली आहे. जयश्री पाटील यांनी मतदारांना आवाहन केलेल्या जाहीर पत्रकात म्हटले आहे की, पक्षाने आपल्याला झुलवत आणि गाफील ठेवले. यामुळेच आपण अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून शिवेसनेचे पुरस्कृत म्हणून मान्य केले आहे.

ठळक मुद्देविद्यमान नगरसेविका जयश्री पाटील यांची नाराजीभाजयुमो सदस्य संग्रामसिंग यांचेही बंडअपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यानंतर शिवसेनेकडून पाठिंबा

जळगाव : आयात उमेदवारांमुळे भाजपात मोठ्या प्रमाणावर नाराजी असून नगरसेविका जयश्री नितीन पाटील व भाजयुमोचे सदस्य संग्रामसिंग सुरेशसिंग सूर्यवंशी यांनी बंडखोरी केली आहे. जयश्री पाटील यांनी मतदारांना आवाहन केलेल्या जाहीर पत्रकात म्हटले आहे की, पक्षाने आपल्याला झुलवत आणि गाफील ठेवले. यामुळेच आपण अपक्ष उमेदवारी कायम ठेवली असून शिवेसनेचे पुरस्कृत म्हणून मान्य केले आहे.भाजपाच्या वाईट दिवसातही उमेदवारी केलीमतदारांना वितरीत केलेल्या पत्रकात जयश्री पाटील यांनी नमूद केले आहे की, त्यांचे पती नितीन पाटील हे १९९५ पासून भाजपाशी एकनिष्ठ आहे. १९९६ ला भाजपाकडून लढण्यास कोणीही तयार नसताना नितीन पाटील यांनी उमेदवारी केली. २००१ ला केवळ ४७ मतांनी पराभूत झाले. २००३ ला निवडून आले. यानंतर जयश्री पाटील या सलग दोनदा भाजपाकडून निवडून आल्या.ज्यांना विरोध केला त्यांनाच भाजपाने जवळ केले - सूर्यवंशीभाजपाने कालपर्यंत ज्या शक्तींना विरोध केला आज त्याच विचाराच्या व्यक्तींना संधी देवून स्वकीयांना डावलले आहे. याविरोधातच अपक्ष म्हणून पक्षाविरोधात पाऊल उचलत प्रभाग १४ ड मध्ये बंडखोरी केल्याचे संग्रामसिंह सुरेशसिंह सूर्यवंशी यांनी सांगितले.संग्रामसिंह हे स्वत: भाजयुमोचे सदस्य असून त्यांचे वडील डॉ. सुरेशसिंह सूर्यवंशी हे भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य व पक्षाचे निष्ठावंत आहेत. स्वत: सुरेशसिंह सूर्यवंशी यांचीही एकदा विधानपरिषदेची उमेदवारी पक्षाने ऐनवेळी कापली होती आणि आता डॉ.सूर्यवंशी यांच्या पत्नी मोहिनी सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्याचे निश्चित असताना आयात केलेल्या उमेदवारांमुळे त्यांना उमेदवारी न देता संग्रामसिंह यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन पक्षाने दिले आणि शेवटपर्यंत झुलवत ठेवले. ज्या ठिकाणाहून त्यांना उमेदवारी देण्यात येणार होती त्या ठिकाणीही आयात उमेदवार दिला. दुसऱ्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यास सांगून ऐनवेळी तेथेही उमेदवारी दिली नाही, असे संग्रामसिंह यांचे म्हणणे आहे.दरम्यान भाजपाने ज्या शक्तींचा विरोध केला त्या विरुद्ध आपल्या वडिलांनी नेहमीच लढा दिला आहे, आणि आज त्याच शक्तींशी पक्षाने सोबत केल्याने आपण स्वतंत्रपणे लढा देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.दरम्यान प्रभाग १४ ड मध्ये भाजपाने राजेंद्र पाटील यांना तर ब मध्ये सुरेखा सुदाम सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे.मॅनेजमेंट गुरुंसह चौघांनी अर्ज भरायला सांगितला अन्....संघटनमंत्री, महानगराध्यक्ष, विधानपरिषदेचे आमदार व पक्षाचे मॅनेजमेंट गुरु यांनी ७ क आणि ड मध्ये अर्ज दाखल करायला सांगितले व नंतर १० रोजी रात्री ७ अ मधून अर्ज भरण्याची सूचना फोनवरुन केली. परंतु नितीन पाटील यांनी सांगितले की आम्हाला महापौर व्हायचे नाही व ओबीसी जात पडताळणीही नाही. यावर पक्षाने सांगितले की, आम्ही तुमच्यासाठी मामींचे तिकिट कापत आहे, तुम्ही ७ अ व ब मध्ये अर्ज भरा. परंतु आमच्यासाठी ज्यांचे तिकिट कापल्याचे सांगितले, त्यांनी आधीच जावून अर्ज भरला, असे आम्हाला गाफील ठेवले व नंतर आमचा फोनही पदाधिकाºयांनी घेतला नाही. यानंतर जयश्री पाटील यांनी ७ ड मधून उमेदवारी केली आहे. यावर आम्ही काय गुन्हा केला? असा सवाल जयश्री पाटील यांनी केला आहे. या ठिकाणी भाजपाने सचिन भिमराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक