कुंदन पाटीलजळगाव : शासकीय जमीन महसुल व गौण खनीजपोटी २३ मार्चपर्यंत झालेल्या वसुलीत जळगाव आणि बोदवड तालुका पिछाडीवर आहे.त्यामुळे ३१ मार्चपूर्वी अर्थात दोन दिवसात दोन्ही तहसील कार्यालयांना वसुलीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जमीन महसुलीबोटी ५६ कोटी तर गौण खनीज वसुलीपोटी ७२ कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी दि.२३ मार्चपर्यंत जमीन महसुलपोटी सुमारे ३२ कोटींची तर गौण खनीजापोटी ६१ कोटींची वसुली करण्यात आली आहे. या दोन्ही वसुलींची अनुक्रमे टक्केवारी ५६.९५ व ८५.१२ इतकी आहे. दोन्ही उद्दिष्टांपैकी ९३ कोटींची वसुली झाली आहे. येत्या तीन दिवसात ३५ कोटींची वसुली करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.
तालुकानिहाय उद्दिष्ट, वसुली व टक्केवारी (लाखात)तालुका - जमीन महसुल - वसुली - गौण खनिज - वसुली - दोघांची टक्केवारी बोदवड - १२०.०० - ४६.७० - २०० - ९४.२० - ४४.०३जळगाव - १५९०.०० - ५९१.९४ - ७७५ - ४०४.५२ - ४२.१३भडगाव - १६०.०० - ७६.२४ - ३२५.०० - २०३.२४ - ५७.६२चोपडा - ३९९.०० - १८२.३५ - ३००.०० - २०२.५६ - ५५.०७अमळनेर - २४०.०० - १४९.७५ - ५७५.०० - ३६६.४० च ६३.३३धरणगाव - १८०.०० - १४०.३९ - ६२५.०० - ४२५.७० - ७०.३२चाळीसगाव - ६३६.०० - १९०.०६ - ९००.०० - ९०२.१४ - ७१.११पारोळा - १२०.०० - ९०.४० - २२५.०० - १७३.१४ - ७६.३९मुक्ताईनगर - २१२.०० - १७५.६६ - ३००.०० - २३८.८९ - ८०.९७पाचोरा - ३००.०० - २३०.२५ - ५५७.०० - ४४०.०२ - ७८.२१यावल - ३८३.०० - २२६.५१ - ३००.०० - ३६३.३२ - ८६.३६भुसावळ - ४४०.०० - २२०.८७ - ६५०.०० - ८८७.८७ - १०१.७२रावेर - ३४०.०० - २९६.५७ - २७५.०० - ३६७.६९ - १०८.०१एरंडोल - १८०.०० - १२९.४५ - ६७५.०० - ६४६.२८ - ९०.७३जामनेर - ३००.०० - ४४१.९० - ६००.०० - ४८२.४६ - १०२.७१एकूण - ५६००.०० - ३१८९.०४ - ७२८२.०० - ६१९८.४३ - ७२.८७