शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने निनादले जळगाव शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 7:25 PM

रामनवमीनिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेने वेधले लक्ष

ठळक मुद्दे ढोल-ताशाच्या गजरावर भगवे झेंड घेऊन थिरकणारे युवक ठरले आकर्षण आकर्षक देखावे, रोप मल्लखांबची प्रात्यक्षिकेही सादरमहाआरतीने झाला समारोप

जळगाव: सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे श्रीराम नवमीनिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेने नागरिकांचे लक्ष वेधले. मिरवणुकीत सहभागी वाहनांवरील आकर्षक देखावे, रोप मल्लखांबची सादर होणारी प्रात्यक्षिके, ढोल-ताशांच्या गजरावर भगवे झेंडे घेऊन थिरकणारे युवक या शोभायात्रेचे आकर्षण ठरले. प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने शहर निनादले.श्रीराम नवमीनिमित्त रविवार, २५ रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे दुपारी वाजता गोलाणी मार्केटजवळील दक्षीणमुखी हनुमान मंदिरापासून ते जुने जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास महापौर ललित कोल्हे, आमदार सुरेश भोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, माजी आमदार आर.ओ.पाटील, सुनील भंगाळे, गितेश पवार, भगवतीप्रसाद मुंदडा, आदींच्या हस्ते आरती करून या शोभायात्रेस प्रारंभ झाला. त्यात विविध मंडळे, सामाजिक मित्र मंडळ व धर्मप्रेमी जनतेने सहभाग घेतला.रोप मल्लखांबने वेधले लक्षमिरवणुकीच्या सर्वात पुढे युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे मोठ्या क्रेनला दोर बांधून त्यावर काही लहान मुलींमार्फत रोप मल्लखांबची प्रात्यक्षिक सादर केली जात होती. त्यासाठी प्रत्येक चौकात पोहोचल्यावर तेथे रस्त्यावर गाद्या टाकून हे प्रात्यक्षिक सादर केले जात होते. या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.विविध मंडळांचा सहभागमिरवणुकीत जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळाने श्रीराम पादुका व रामसेतू दर्शन देखावा सादर केला होता. प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतेची मूर्ती तसेच त्यासमोर काचेच्या भांड्यात पाण्यात रामसेतूचे पाण्यात तरंगणारे दोन दगड ठेवण्यात आले होते. भाविक तेथे येऊन त्याचे दर्शन घेत होते. नेहरू चौक मित्र मंडळ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, जानकीनगर मित्र मंडळ, युवा शक्ती फाऊंडेशन, जय श्रीराम बहुउद्देशीय संस्था, पंचमुखी हनुमाननगर, आदी विविध मंडळे ट्रॅक्टरवर प्रभू श्रीरामाची मूर्ती अथवा फोटो ठेवून मंडळाचे कार्यकर्ते त्यापुढे ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करताना दिसत होते. गोलाणी मार्केटजवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. तेथून चित्राचौक, दाणाबाजार, सुभाष चौक, सराफबाजार,रथचौक मार्गे जुने जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचली. श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादिपती मंगेश महाराज तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती होऊन समारोप झाला.विविध मंडळांकडून पाणी व सरबत वाटपविविध मंडळांकडून शोभायात्रेत सहभागी कार्यकर्ते व भाविकांसाठी पाणी पाऊच तसेच सरबताचे वाटप करण्यात आले. दाणाबाजारच्या कोपऱ्यावर काँग्रेस भवन येथील दत्तमंदिरातर्फे सरबत वाटप करण्यात आले.आकर्षक रांगोळ्या, पताकांनी वातावरण निर्मितीशोभायात्रेच्या मार्गावर नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच विविध मंडळे, संघटनांनी शुभेच्छांचे फलक, पताका लावल्या होत्या. त्यामुळे वातावरणात अजूनच उत्साह निर्माण होत होता.यशस्वीतेसाठी समितीचे सचिन नारळे, किशोर भोसले, ललित चौधरी, बंटी नेरपगारे, मुकुंद मेटकर, शामकांत सोनवणे, शरद तायडे, सुरज दायमा, राकेश लोहार, विराज कावडिया, अमित जगताप, अजय गांधी, प्रभाकर पाटील व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.