आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३ : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या बंदला जळगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला, मात्र तणावपूर्ण शांतता कायम होती. गणेश कॉलनीत स्वीट मार्ट व एका दवाखान्यावर झालेली दगडफेक वगळता बंदही शांततेत पाळण्यात आला. बंदला घालबोट लावण्याचा प्रयत्न करणाºया तिघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मंगळवारी राष्ट्रीय महामार्गावर एस.टी.बसची तोडफोड करुन चालकासह बसला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला होता, त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनातर्फे शहरात कडेकोट बंदोबस्त लावला होता. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्यासह सर्व प्रभारी अधिकारी रस्त्यावर उतरले होते. याशिवाय पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्या होत्या. प्रत्येक चौक, महामार्ग, गर्दीचे ठिकाण, रेल्वे व बस स्थानक, व्यापारी संकुल व मॉल आदी ठिकाणी वाढीव बंदोबस्त लावण्यात आला होता.दुकाने बंद करण्यासाठी सक्तीगोलाणी मार्केट, फुले मार्केट, रेल्वे स्टेशन व दाणाबाजार या पसिरात व्यावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती, मात्र काही किरकोळ दुकाने सुरु असल्याने ती बंद करण्यासाठी भीमसैनिकांनी सक्ती केली होती. एकत्रित संख्या जास्त असल्याने भीतीपोटी व्यावसायिकांनी पटापट दुकाने बंद केली. हॉटेल, फरसाण यांची किरकोळ दुकाने सुरु होती. मॉल, सराफ बाजार बंदबंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख लहान मोठे मॉल, सराफ बाजार, दाणा बाजार, कापड बाजार यासह मुख्य बाजारपेठ बंद होती. सकाळी दहा वाजता सुरुझालेली काही दुकाने नंतर बंद झाली होती. दुपारनंतर काही दुकाने सुरु झाली होती. मुख्य बाजारपेठ वगळता सिंधी कॉलनी, पिंप्राळा, आयोध्या नगर, गणेश कॉलनी या भागात बहुतांश दुकाने सुरु होती.पोलीस बंदोबस्तात रॅलीआंबेडनगर नगरातील भीमसैनिकांनी एकत्र येऊन रेल्वे स्टेशनवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅली काढली. यावेळी रस्त्यावरील गांधी मार्केट व फुले मार्केटमध्ये सुरुअसलेल्या दुकानांकडे धाव घेतल्याने पळापळ झाली होती. या हालचाली लक्षात घेता पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी रॅलीच्या मागे पुढे व मध्यभागी पोलिसांचा ताफा तैनात केला होता. स्वत: सांगळे, शनी पेठचे निरीक्षक प्रवीण वाडिले व शहरचे निरीक्षक प्रदीप ठाकूर हे रॅलीसोबत चालत आले. रेल्वे स्टेशन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला वंदन व प्रार्थना म्हटल्यानंतर सर्व भीमसैनिकांना पुन्हा आंबेडकर नगरात पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले. तेथे रॅली विसर्जित झाली. यावेळी तणावाची स्थिती कायम होती.
जळगाव शहरात दवाखाना व स्वीट मार्टवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 3:51 PM
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या बंदला जळगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला, मात्र तणावपूर्ण शांतता कायम होती. गणेश कॉलनीत स्वीट मार्ट व एका दवाखान्यावर झालेली दगडफेक वगळता बंदही शांततेत पाळण्यात आला. बंदला घालबोट लावण्याचा प्रयत्न करणाºया तिघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ठळक मुद्देबंदला संमिश्र प्रतिसादतणावपूर्ण शांतता कायम रेल्वे स्टेशन, गांधी मार्केट व गोलाणी मार्केटमध्ये गोंधळ