आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२० : शिक्षिका सोनल गणेश सोमाणी (वय ३७ रा.भिकमचंद जैन नगर, जळगाव) यांच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोनसाखळी लांबविणारी जुलेखा रहिम इराणी व अरबाज इराणी (दोन्ही रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) या दोघांना सुरत येथे पळून जात असतानाच शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली.या दोघांनी सोमवारी दुपारी दीड वाजता भिकमचंद जैन नगरात सोनल सोमाणी यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवून पळ काढला होता. घटना घडल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे विजयसिंग पाटील व प्रितम पाटील यांनी रस्त्यावरील दुकान व कार्यालयांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दुचाकीस्वार अरबाज व जुलेखा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे व पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी तपासासाठी पथक तैनात केले होते.
भुसावळ येथून बसले रेल्वेतगुन्हा घडल्यानंतर शहर पोलिसांनी भुसावळ पोलिसांना संशयिताचे फुटेज व दुचाकीचा क्रमांक पाठविला असता भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुनील सैंदाणे, बाजारपेठचे निलेश बाविस्कर, दीपक जाधव, राहूल चौधरी, प्रशांत चव्हाण व उमाकांत पाटील यांचे पथक दोघांच्या शोधार्थ निघाले. ही दुचाकी रहिम इराणी याची असल्याचे निष्पन्न झाले, मात्र तो कारागृहात असल्याने पोलिसांनी त्याची पत्नी जुलेखाचा शोध घेतला असता जुलेखा व अरबाज हे सोमवारी रात्रीच सुरत जाणाºया रेल्वेत बसले. व ही गाडी जळगावच्या दिशेन रवाना झाल्याची माहिती मिळाली.
जळगाव स्थानकावर सापळा जळगाव शहरच्या सहायक निरीक्षक सारिका कोडापे, सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, संजय हिवरकर, गणेश शिरसाळे, इम्रान अली सैय्यद, मोहसीन बिराजदार, अक्रम शेख, रतन हरी गिते, सादीक शेख, विकास महाजन व गणेश पाटील यांचे पथक ही गाडी जळगाव स्थानकावर पोहचण्याच्याआधी साध्या वेशात तेथे पोहचले. सर्व बोगीत तपासणी केली असता तिसºया क्रमांकच्या बोगीत दोन्हीही आढळून आले. दरम्यान, दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.