- कुंदन पाटीलजळगाव : एप्रिल महिन्याच्या या आठवड्यात तापमानाचा पारा पस्तीशीच्या घरात राहणार आहे. तर गुरुवार ते शनिवारदरम्यान विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा चाळीशी पार करेल, असा अंदाज गेल्या आठवड्यात व्यक्त करण्यात आला होता. तर गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर असल्याने जळगावकरांना उन्हाचा तडाखा जाणवत आहे. तशातच दि. ६ ते ८ रोजीदरम्यान ढगाळ वातावरणासह काहीठिकाणी विजांचा कडकडाटासह ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. त्यामुळे तापमानाचा पारा पुन्हा घरसरणार आहे. दि.९ ते ११ दरम्यान हा पारा ३४ अंश सेल्सिअसच्या घरात असणार आहे. साहजिकच जळगावकरांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळणार आहे.असा आहे ‘आयएमडी’चा तापमानाचा अंदाजदिनांक किमान कमाल वातावरण ६ २१.० ३६.० ढगाळ/विजांचा कडकडाट ७ २१.० ३७.० ढगाळ/विजांचा कडकडाट ८ २०.० ३६.० ढगाळ/विजांचा कडकडाट ९ २०.० ३५.० ढगाळ/विजांचा कडकडाट१० २०.० ३५.० ढगाळ ११ २०.० ३४.० ढगाळ
jalgaon: पुन्हा ‘अवकाळी’चे ढग! तीन दिवस विजांचा कडकडाटासह ढगाळ वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 5:12 PM