सुनील पाटील / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 16- शरीरासाठी अत्यंत घातक व मुदतबाह्य झालेल्या विदेशी सिगारेट समुद्रामार्गे व तेही कर चुकवून भारतात येतात. एकटय़ा जळगाव शहरात महिन्याला 25 कोटी रुपयांच्या सिगारेट येत असल्याची धक्कादायक माहिती आहे.शहर व जिल्ह्यातील लहान मोठय़ा पानटप:यांवर तसेच बियर बारमध्ये या घातक सिगारेटची सर्रास विक्री होत आहे. किमतीने महाग असलेल्या या सिगारेटच्या व्यसनाच्या आहारी तरुण पिढी गेली आहे. अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी या विक्रेत्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई येथील सामाजिक संस्थेने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने दोन लाख 47 हजार 150 रुपये किमतीच्या सिगारेट जप्त केल्या होता, तेव्हा सिगारेटमधील गैरप्रकार उघड झाला. मुंबई येथील वुई केअर आणि क्युसेड अगेन टोबॅको या दोन सामाजिक संस्था अशा प्रकारच्या सिगारेट विक्रीवर आळा घालण्यासाठी काम करतात. या संस्थांनी देशभरात शंभराच्यावर ठिकाणी कारवाया करून विक्रेत्यांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. जळगावात या संस्थांचे मुंबई येथील केल्मींट फेअरओ, दीपेश गुप्ता व शंकर ताम्रकर यांच्या पथकाने सिगारेटचा साठा पकडला होता. सुगंधासाठी घातक केमिकल्सचा वापरया सिगारेट बनविताना त्यात सुंगध यावा यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो. मात्र त्यासाठी सिगारेट वापराबाबत मुदत निश्तिच करण्यात येते. ही मुदत संपल्यानंतर सिगारेट शरीरासाठी अत्यंत घातक असतात. या सिगारेट वापरणा:यांना कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करावा लागतो. हा प्रकार लक्षात आल्यानंतर देशभरातील मोठय़ा महानगरातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन प्रशासनाच्या मदतीने भारतभर धाडसत्राची मोहीम उघडली आहे.कागदावर नष्ट होतो सिगारेटचा साठासूत्रांच्या माहितीनुसार इंडोनेशिया या देशात उत्पादित होणा:या विविध ब्रॅँडच्या अत्यंत महागडय़ा असलेल्या या सिगारेट काळ्या बाजारातून येतात. मुदत संपल्यानंतर या सिगारेट नष्ट करणे अपेक्षित असते, मात्र काळा बाजार करणारी साखळी या सिगारेट फक्त कागदावरच नष्ट करते. वेगवेगळ्या मार्गाने कर चुकवून या सिगारेट भारतात येतात. एकटय़ा जळगाव शहरात महिन्याला 25 कोटी रुपयांच्या सिगारेट येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विदेशातून या सिगारेट सागरीमार्गे भारतात येतात. विक्रेत्याकडे या सिगारेटचे कोणतेच बील नव्हते. तसेच उत्पादनाची तारीख व मुदत संपल्याची तारीख सिगारेटवर नाही. तसेच शरीराला घातक असलेला वैज्ञानिक इशाराही नसतो.पुरवठादारालाच अभय?सिगारेट विदेशातून भारतात येत असल्याने यात मोठी यंत्रणा गुंतल्याचा संशय आहे. या साखळीच्या माध्यमातून मोठय़ा शहरात व तेथून लहान शहरात या सिगारेट पोहचतात. या विषारी सिगारेटमुळे कॅन्सर आजार होतो. मुख्य पुरवठादाराला शोधणे गरजेचे आहे, दुर्दैवाने सरकारी यंत्रणा यात कमी पडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जळगाव जिल्ह्यात इंदूर येथून या सिगारेट येत असल्याची माहिती मिळाली आहे.10 पासून 200 र्पयत सिगारेटविदेशातून आलेल्या सिगारेटचे दर 10, 70 व 200 रुपये असे आहेत. गुडंग गरम या सिगारेटला तर बंदीच आहे. ब्लॅकचे पाकीट 120 तर गरमचे 100 रुपयाला मिळते तर अन्य कंपनीचे पाकीट 300 रुपयाला मिळते. हे दर मुदतबाह्य झालेल्या सिगारेटचे आहेत. मुदतीतील एका सिगारेटची किंमत 200 रुपयाच्या घरात आहे.आयटीसीचे नियंत्रणसिगारेट विक्री, उत्पादन, पुरवठा यावर इंडियन टोबॅको कंपनी (आयटीसी) या सरकारी संस्थेचे नियंत्रण असते. भारतातील सिगारेट उत्पादीत कंपन्या दर दोन महिन्यांनी पाकीटावर लोगो बदलवितात. विदेशातील सिगारेटवर मात्र असे लोगो नसतात. मुदत संपल्यानंतर हा सिगारेटचा साठा नष्ट न करता समुद्रामार्गे भारतात येतो.