जळगाव : निवडणुकीच्या कारणावरुन झालेल्या वादातून माजी नगरसेवक तथा भाजपाचे उमेदवार दत्तात्रय देवराम कोळी यांच्या डोक्यात वीट मारुन जखमी केल्याची घटना रविवारी रात्री साडे बारा वाजता कांचन नगरात घडली. याप्रकरणी शैलेश रामराज ठाकरे, शांताराम रामराज ठाकरे व यशवंत उर्फ रवी रामराज ठाकरे या तिघांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रभाग क्रमांक ३ ब मधून राहूल मोहन ठाकरे हे शिवसेनेकडून तर भाजपाकडून दत्तात्रय कोळी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवार एकमेकाच्याविरोधात असल्याने दोन्ही गटात रविवारी रात्री वाद झाला. त्यात शैलेश ठाकरे याने दत्तात्रय कोळी यांच्या डोक्यात वीट मारल्याचा आरोप आहे. डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शनिपेठ पोलीस स्टेशनला जमले होते. रात्री दोन वाजेपर्यंत हा वाद सुरु होता. दत्तात्रय कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शैलेश रामराज ठाकरे, शांताराम रामराज ठाकरे व यशवंत उर्फ रवी रामराज ठाकरे (रा.वाल्मिक नगर, जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल आहे. तर विरोधी गटाचे शैलेश रामराज ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन सपकाळे गटाचे अनिल पुंडलिक सपकाळे, सुभाष देवराम कोळी व जय दत्तात्रय कोळी या तिघांविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे.
जळगावात नगरसेवक दत्तात्रय कोळी यांच्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 7:22 PM
निवडणुकीच्या कारणावरुन झालेल्या वादातून माजी नगरसेवक तथा भाजपाचे उमेदवार दत्तात्रय देवराम कोळी यांच्या डोक्यात वीट मारुन जखमी केल्याची घटना रविवारी रात्री साडे बारा वाजता कांचन नगरात घडली.
ठळक मुद्देजळगाव महापालिका निवडणुकीचे कारणकांचन नगरात मध्यरात्री वादहाणामारी प्रकरणात तिघांना घेतले ताब्यात