आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२९ : राज्यभरात २६४ शाखांच्या १ लाख ठेवीदारांचे ७०० कोटी अडकून पडल्याने गेल्या ४ वर्षापासून त्रस्त असलेल्या राज्यभरातील ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी ‘थाली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. आंदोलनाची दखल घेऊन अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी तत्काळ आढावा बैठक घेऊन बीएचआरच्या अवसायकांकडून वसुली व ठेवीचा गोषवारा घेत ठेवी तत्काळ मिळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे, समन्वयक श्रीकृष्ण शिरोळे, डी.टी.नेटके, कमल सुरेश भिरूड यांच्या नेतृत्वात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १ वाजता थाली बजाओ आंदोलन करण्यात आले. बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे, जिल्हा विशेष लेखापरिक्षक रावसाहेब जंगले, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर व रावेर, यावल, भुसावळ तसेच जळगाव तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांच्यासोबत ठेवी परत करण्याच्या उपाययोजना राबविण्याची विशेष आढावा बैठक बोलाविण्यात यावी अशी मागणी लावून धरली होती. अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याची दखल घेऊन दुपारी ३ वाजता बैठकीचे आयोजन केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
जळगावात ठेवीदारांचे ‘थाली बजाओ’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:09 PM
राज्यभरात २६४ शाखांच्या १ लाख ठेवीदारांचे ७०० कोटी अडकून पडल्याने गेल्या ४ वर्षापासून त्रस्त असलेल्या राज्यभरातील ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी ‘थाली बजाओ’ आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणलाबीएचआरच्या ठेवींसाठी आढावा बैठकराज्यभरातील ठेवीदारांचा आंदोलनात सहभाग