शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

जळगावात ठेवीदारांच्या ‘थाली बजाओ’ आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:52 PM

बीएचआरच्या ठेवींसाठी आढावा बैठक

ठळक मुद्देराज्यभरातील ठेवीदारांचा आंदोलनात सहभागबीएचआरच्या अवसायकांनी सादर केला आढावा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३० - राज्यभरात २६४ शाखांच्या १ लाख ठेवीदारांचे ७०० कोटी अडकून पडल्याने गेल्या ४ वषार्पासून त्रस्त असलेल्या राज्यभरातील ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी ‘थाली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. आंदोलनाची दखल घेऊन अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी तत्काळ आढावा बैठक घेऊन बीएचआरच्या अवसायकांकडून वसुली व ठेवीचा गोषवारा घेत ठेवी तत्काळ मिळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे, समन्वयक श्रीकृष्ण शिरोळे, डी.टी.नेटके, कमल सुरेश भिरूड यांच्या नेतृत्वात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १ वाजता थाली बजाओ आंदोलन करण्याक आले. बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे, जिल्हा विशेष लेखापरिक्षक रावसाहेब जंगले, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर व रावेर, यावल, भुसावळ तसेच जळगाव तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांच्यासोबत ठेवी परत करण्याच्या उपाययोजना राबविण्याची विशेष आढावा बैठक बोलाविण्यात यावी अशी मागणी लावून धरली होती. अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याची दखल घेऊन दुपारी ३ वाजता बैठकीचे आयोजन केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.बीएचआरच्या अवसायकांनी सादर केला आढावाभाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या प्रलंबित ठेवींचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा म्हणून संघटनेच्या वतीने संस्थेचे लेखापरिक्षण १ महिन्यात पूर्ण करून सार्वजनिक करावे, संस्थेची ठेव वाटपाची पद्धत पारदर्शी असावी म्हणून वसुली व वाटप केलेल्या ठेवींचा अहवाल मिळावा, संघटनेच्या ४०-४५ ठेवीदारांच्या हार्डशीप प्रकरण म्हणून मान्यता मिळून सुद्धा देण्यात न आलेल्या १०० टक्के ठेवी परत मिळाव्यात, संस्थेच्या संशयीत आरोपी संचालकांच्या मालमत्ता जप्तीची व विक्रीची कार्यवाही व्हावी व एमपीआयडी कायद्याप्रमाणे ठेवीदारांना ठेवी वाटप व्हाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडे प्रलंबित असलेल्या अधिसूचना प्रसिद्धीच्या कार्यवाहीचा अवसायक व जिल्हाधिकारी यांनी पाठपुरावा करावा अशा मागण्या करत निवेदन देवून संस्थेच्या अवसायकांची तक्रार संघटनेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी गाडीलकर यांच्याकडे बैठकीत करण्यात आली. यावेळी अवसायक कंडारे यांनी महिनाभरात वसुली व ठेवी वाटपाचा अहवाल तसेच संघटनेच्या मागण्यांचा विस्तृत अहवाल देण्याचे जाहीर केले. लेखापरिक्षण अंतिम टप्प्यात असून १५ जुलै पर्यंत लेखापरिक्षण अहवाल देण्याचे मान्य केले. संस्थेच्या ३० हजारापर्यंतच्या ठेव वाटपाच्या धोरणाला संघटनेचा विरोध असल्याचे बैठकीत बोलून दाखविण्यात आल्यानंतर पारदर्शी धोरण असण्यासाठी जनसंग्राम ठेवीदार संघटनेशी यापुढे समन्वय व सतत संपर्क ठेवला जाईल असे नमूद केल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.५० हजारापुढील ठेवी वाटपाला लवकर सुरूवात करण्याच्या ठेवीदारांच्या मागणीला त्यांनी होकार दर्शविल्याचेही संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. अवसायक कंडारे यांनी संस्थेचा संपूर्ण आढावा बैठकीत सादर केला.५०० कोटींच्या विशेष अर्थसहाय्यासाठी ठेवीदार आग्रहीबैठकीत बीएचआर संस्थेनंतर जळगाव जिल्ह्यातील अडचणीत असलेल्या व अडचणीत नसलेल्या सर्वच पतसंस्थांच्या ठेवीदारांना ठेवी परत करण्याचा ठोस कृती कार्यक्रम राबविण्यात यावा, जिल्हाधिकाऱ्यांनी दर पंधरवाड्यात याचा आढावा घ्यावा, अनियमितता करणाºया पतसंस्था चालकांवर ई.डी.अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात यावी व शासनाकडून ५०० कोटींचे विशेष अर्थसहाय्य मिळवून ठेवीदारांना न्याय द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या. याबाबत जिल्हा उपनिबंधक जाधवर यांनी अर्थसहाय्य नाकारलेल्या व ठेवी परत न करू शकलेल्या संस्थांवर तसेच अर्थसहाय्याची मुदतीत रक्कम परत न करणाºया संस्थांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करणार असल्याचे नमूद केले, असे विवेक ठाकरे यांनी कळविले. ठेवीदारांसाठी शासनाकडे विशेष अर्थसहाय्य मागणीच्या प्रस्तावावर जिल्हा प्रशासनाच्या शिफारशीनंतर पाठपुरावा करण्यात येईल तसेच ठेव पावत्यांच्या बदल्यात लिलावातून ठेवी परत करण्यावर भर राहील असे जाहिर केल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान रावेर, यावल, भुसावळ व जळगाव तालुक्यातील संस्थांचा नियमित आढावा घेण्याचे स्पष्ट केले.जनसंग्राम बहुजन लोकमंच संलग्न महाराष्ट्र राज्य ठेवीदार समितीच्या पदाधिकाºयांनी व ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले. बैठकीला बीचएचआर पतसंस्थेच्या वसुली पथकाचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी - कर्मचारी यांच्यासह ठेवीदार संघटनेचे प्रातिनिधीक शिष्टमंडळाची उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक डी.टी.नेटके यांनी तर श्रीकृष्ण शिरोळे यांनी आभार मानले.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव