आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १० : रिक्षाने शाळेत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा अंगावर पलटी होऊन चेतन दिवाकर सोनवणे (वय १५ रा. देऊळवाडा, ता. जळगाव ह.मु.जोगलखेडा, ता.भुसावळ) हा विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता जोगलखेडा-साकेगाव रस्त्यावर घडली. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चेतन हा भुसावळ येथील सानेगुरुजी विद्यालयात शिक्षण घेत आहे. जोगलखेडा येथून सावन धनराज ढिवरे याच्या रिक्षाने (क्र.एम.एच.१९-९२४८) तो भुसावळ येथे शाळेत जायला निघाला. या रिक्षात चालक व चेतन असे दोघंच होते तर साकेगाव येथून काही विद्यार्थी या रिक्षात बसणार होते. जोगलखेडा सोडल्यानंतर काही अंतरावर चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे रिक्षा पलटी झाली. मागे बसलेला चेतन हा बाहेर फेकला गेला व त्यात ही रिक्षा पुन्हा उलटली ती चेतनच्या डोक्यावरच. या अपघातात जागेवरच चेतनच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला, त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. रिक्षा चालक जखमी झाला असून त्याला भुसावळ येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
अंगावर रिक्षा उलटल्याने जळगाव जिल्ह्यात दहावीचा विद्यार्थी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 4:43 PM
रिक्षाने शाळेत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा अंगावर पलटी होऊन चेतन दिवाकर सोनवणे (वय १५ रा. देऊळवाडा, ता. जळगाव ह.मु.जोगलखेडा, ता.भुसावळ) हा विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता जोगलखेडा-साकेगाव रस्त्यावर घडली.
ठळक मुद्दे साकेगावजवळ अपघात शाळेत जात असतानाच घडली दुर्घटना रिक्षा चालक जखमी