जळगाव,दि.14- सात-बारा संगणकीकरणात जिल्ह्याने प्रगती साधत कामकाजाच्या टक्केवारीत 30 व्या क्रमांकावरून 21 व्या क्रमांकावर मजल मारली आहे. संगणकीकरण झालेल्या उता:यांच्या संख्येच्या तुलनेत मात्र जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे.
7/12 संगणकीकरण हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याच्या सर्व जिल्ह्यांना सूचना होत्या. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यास ‘एडिट मोडय़ूल’ ही प्रणाली तयार करून दिली आहे. या प्रणालीच्या आधारे संगणकीकृत गाव नमुना नंबर 7/12 मुळ हस्तलिखीत 7/12 शी जुळविण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 11 लाख 70 हजार 591 सव्र्हे क्रमांक असून त्यापैकी 9 लाख 53 हजार 732 इतके सव्र्हे क्रमांक दुरूस्त करण्यात आले आहेत. भडगाव, रावेर, यावल, पारोळा, चोपडा, बोदवड, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर आणि पाचोरा या 10 तालुक्यातील एडिट मोडयूल या प्रणालीचे काम 30 एप्रिलर्पयत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर 7/12 उतारे असलेल्या गावांची संख्या जास्त असल्याने चाळीसगाव, जामनेर, अमळनेर, जळगाव व भुसावळ या पाच तालुक्यात एडिट मोडय़ूल या प्रणालीतील नोंदीचे काम 15 मे र्पयत पूर्ण करायचे आहे.