जळगाव : जिल्ह्यात पाच ते सहा हजार हेक्टरवर क्षेत्रावरील मक्यावर लष्करी आळीचा प्रादर्भाव झाला असून पूर्व हंगामी कापसावरही गुलाबी बोंडअळीचा प्रादर्भाव सुरू झाला आहे.जिल्ह्याच्या कृषी उत्पन्नात मोठा वाटा असलेल्या मका व कापसावर यंदाही आळ््यांचा हल्ला सुरू झाला आहे. या मध्ये जिल्ह्यात एकूण ८० हजार हेक्टरवर लागवड क्षेत्रापैकी भडगाव, चोपडा, जळगाव, चाळीसगाव या तालुक्यांसह जिल्ह्यात इतर ठिकाणी मिळून पाच ते सहा हेक्टर क्षेत्रावरील मक्यावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला असल्याची माहिती कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिली.नुकसानीचे प्रमाण अधिकमक्यावर केवळ प्रादुर्भाव होऊनच हा प्रकार थांबला नसून या आळीमार्फत होणाऱ्या नुकसानीचे पातळीदेखील मोठी वाढली असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. एका रात्रीतून ही आळी १०० कि.मी. चा प्रवास करीत त्या क्षेत्रातील मक्याला बाधा पोहचवत आहे.मक्याच्या पोंग्यात लिंबोळी अर्क वापरालष्करी आळीचे वाढते प्रमाण पाहता उपाययोजना करताना मक्याच्या पोंग्यात औषधी तसेच लिंबोळी अर्काचाही वापर करण्याचे सुचविण्यात आले. या सोबतच फवारणी करताना काळजी घेण्याचे घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.गुलाबी बोंडआळीचा कापसावर हल्लाजिल्ह्यात ४ लाख ९५ हजार क्षेत्रावर कापसाची लागवड झाली असून चोपडा, जळगाव, रावेर तालुक्यातील पूर्व हंगामी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावर सुरू झाली असल्याची माहितीही भोकरे यांनी दिली.विशेष म्हणजे यंदा कापसावर गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव होणार नाही, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र तसे न होता हा प्रादूर्भाव सुरू झाल्याचे आढळून येत असल्याचे पाहणीदरम्यान आढळून आल्याचे सांगण्यात आले. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षाप्रमाणे कृषी विभागाच्या मोहिमेला जसा प्रतिसाद शेतकºयांनी दिला होता, ता प्रतिसाद यंदाही मिळणे अपेक्षित असल्याचे भोकरे यांनी सांगितले.दोन वर्षांपूर्वी साडेचार ते पाच कोटींचा फटका या गुलाबी बोंडअळीमुळे बसला होता. त्यामुळे यंदा दक्षता घेणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.शेतकरी शेतीशाळेचा लाभ घ्यापिकांवरील किड नियंत्रणासाठी एकात्मिक पिक व्यवस्थापन गरजेचे असण्यासह शेतकºयांनी शेतीशाळेचाही लाभ घेणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यात ४६३ शेतीशाळा सुरू असून १५ दिवसातून निवडलेल्या गावाला ही शेती शाळा होते. त्याला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यात मक्यावर लष्करी आळीचा तर कापसावर गुलाबी बोंडअळी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:54 PM