जळगाव : भाजप तालुकाध्यक्ष निवडीसंदर्भात तालुकानिहाय कार्यक्रम निश्चित करण्यासाठी बुधवारी जळगावात भाजपची बैठक होऊन त्यात २२ ते २६ डिसेंबरपर्यंत तालुकाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यानुसार २२ डिसेंबर रोजी पहिल्या दिवशी चाळीसगाव शहर व चाळीसगाव ग्रामीण तालुकाध्यक्षांची तर २६ रोजी शेवटच्या दिवशी भुसावळ शहर व ग्रामीण तालुकाध्यक्षांची निवड होणार आहे.भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातच संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम लांबत असून डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप बुथ व मंडळ अधिकारी यांचीच निवड पूर्ण झालेली नाही. त्यामुळे १० डिसेंबरपर्यंत होणारी जिल्हाध्यक्ष निवडही लांबणीवर पडली आहे. या संघटनात्मक निवडणुकीअंतर्गत तालुकाध्यक्ष निवडीच्या तारखा ठरविण्यासंदर्भात १८ रोजी जळगाव येथे भाजप कार्यालयात प्रदेश चिटणीस लक्ष्मणराव सावजी, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.या वेळी जिल्हा निवडणूक अधिकारी रावसाहेब दानवे पाटील यांच्या संमतीने सहाय्यक निवडणूक अधिकारी विजय धांडे यांनी तालुकाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही निवड होणार असून यासाठी बूथ समिती, शक्ती केंद्र प्रमुख, तालुक्यातील पदाधिकारी, स्थानिक आमदार, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.या बैठकीस जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, सरचिटणीस पोपट भोळे, सदाशिव पाटील, हर्षल पाटील, जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी, सर्व मंडळ अध्यक्ष व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.तालुकानिहाय निवडणूक कार्यक्रम- २२ डिसेंबर : चाळीसगाव शहर - दुपारी ४ वाजता, चाळीसगाव ग्रामीण - दुपारी १ वाजता.- २३ डिसेंबर : भडगाव - दुपारी १ वाजता, पाचोरा शहर - दुपारी ४ वाजता, पाचोरा ग्रामीण - दुपारी २ वाजता, चोपडा शहर - दुपारी ३ वाजता, चोपडा ग्रामीण - दुपारी १ वाजता.- २४ डिसेंबर : मुक्ताईनगर - सकाळी ११ वाजता, बोदवड दुपारी ३ वाजता, पारोळा - दुपारी ३ वाजता, एरंडोल - दुपारी ३ वाजता, जळगाव ग्रामीण - दुपारी १ वाजता.- २५ डिसेंबर : रावेर - दुपारी १२ वाजता, यावल - दुपारी ३ वाजता, जामनेर - दुपारी १ वाजता, अमळनेर शहर - दुपारी ४ वाजता, अमळनेर ग्रामीण - दुपारी १ वाजता, धरणगाव - दुपारी १ वाजता.- २६ डिसेंबर : भुसावळ शहर दुपारी ४ वाजता, भुसावळ ग्रामीण - दुपारी १ वाजता.
जळगाव जिल्ह्यात भाजप तालुकाध्यक्षांची निवड २६ डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:30 PM