जळगाव,दि.3- ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल केल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासगार राव यांनी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जळगाव जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. निंबाळकर यांच्यावतीने विवेक भिमनवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुंबईत झालेल्या या सोहळ्याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व अन्य अधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी किशोर राजे निंबाळकर यांनी दौरे, बैठका, विविध ठिकाणी भेटी, समन्वय व दैनंदिन पाठपुरावा करून डिजिटल ठाणेचे स्वपA पूर्ण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी शाळांचे शिक्षक, गावांमधील सरपंच यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.