आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ७ - मुख्यमंत्री पेयजल योजनेतून जिल्ह्यात ३५ पाणी योजना मंजूर असून त्यांच्या कामांना सुरूवात झाली आहे. अनेक कामे अंतिम टप्यात असताना आता भूवैज्ञानिक विभागाकडून कामे बंद करण्याच्या सूचना करण्यात येऊन मे महिन्यात ‘ईल टेस्ट’ अर्थात पाण्याची चाचणी घेण्याचे आदेश दिले आहे. यामुळे कामे खोळंबणार असल्याने स्थायी समितीत यावर संताप व्यक्त करण्यात आला.तसेच मुदत संपलेल्या जि.प.च्या व्यापारी गाळ्यांबाबतसमिती नेमण्याचे ठरविण्यात आले.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा ६ रोजी जि.प अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सानेगुरुजी सभागृहात झाली. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के.दिवेकर, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, विषय समित्यांचे सभापती आदी उपस्थित होते.सदस्यांनी व्यक्त केला संतापपाणी योजनांचा आढावा घेताना जिल्ह्यातील ३५ पाणी योजनांचे काम बंद करण्याचे व मे महिन्यात पाण्याची चाचणी घेण्याचा फतवा काढण्यात आल्याने यावर शिवसेनेचे प्रताप पाटील, नानाभाऊ महाजन, राष्ट्रवादीचे शशिकांत साळुंखे यांनी आक्षेप घेतला. एकीकडे जि.प.चा निधी मार्च अखेर खर्च करण्याचे आदेश दिले जातात व दुसरीकडे कामे बंद केली जात असल्याने सदस्यांनी या विषयावर संताप व्यक्त केला.पाझर तलावातील गाळाचा महसूल मिळावाजि.प.च्या मालकीच्या पाझर तलावातून गाळ काढून तो रस्त्यांच्या कामांसाठी वापरला जातो. शासनाकडून याचा महसूल (रॉयल्टी) घेतला जातो. मात्र जि.प.च्या मालकीचे बंधारे असताना महसूल जि.प.ला मिळत नसल्याने शासनाकडे गाळाचा ५० टक्के महसूल जि.प. ला मिळावे असा प्रस्ताव पाठविण्यासाठी ठराव करण्याची मागणी करण्यात आली.पाळधी येथील ठराव रद्दजामनेर तालुक्यातील पहूर पाळधी येथील ग्रामसेवकांनी एका घराचे पाच वारस असताना एकाच जणाच्या नावावर घर केल्याचा प्रताप समोर आल्यानंतर स्थायी समितीत हा ठराव रद्द करण्यात आला. सभागृहाने ठराव रद्द करण्याची मान्यता दिली. सर्वच सभापतींना नवी वाहने देण्यात आली पण आरोग्य सभापतींना न देण्यात आल्याने याबाबतदेखील काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला.गाळ््यांबाबत नाराजीजि.प. मालकीची अल्पबचत भवनात २१ व्यापारी गाळे असून त्यांची मुदत संपल्याने जि.प.च्या सर्वसाधारण सभेत गाळ्यांची थकबाकी वसूल करून त्यांचा लिलाव करण्याचा ठराव केला होता.मात्र आजच्या सभेत सदस्यांनी याबाबत विचारणा केली असता या कामी स्वतंत्र समिती नेमून निर्णयघेवूअसेठरविण्यातआले.हानिर्णय रेंगाळत असल्याने जि.प.चे उत्पन्न बुडत असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.अपंग युनिटची नि:पक्षपणे कारवाई करणार- सीईओजिल्हाभरात अपंग युनिट शिक्षकांच्या बोगस नियुक्त्यांचे प्रकरण गाजत असल्याने आजच्या सभेत या विषयाचे पडसाद उमटले. गेल्या महिनाभरापासून हे प्रकरण सुरू असून यावर प्रशासनाने काय केले? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शशिकांत साळुंखे यांनी उपस्थित केला. शासनाकडे या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या प्रकरणाची नि:पक्षपणे कारवाई केली जाईल, असे आश्वासन सीईओ दिवेकर यांनी जि.प. स्थायी समितीच्या सभेत दिले.
पाण्याची चाचणी घेण्यावरुन जळगाव जि.प. स्थायी समितीत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 1:16 PM
३५ पाणी योजनांना अडथळा
ठळक मुद्देमुदत संपलेल्या जि.प.च्या व्यापारी गाळ्यांबाबत समिती नेमणारसदस्यांनी व्यक्त केला संताप