जळगाव : अनेक आरोप प्रत्यारोपानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बबिता कमलापूरकर यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली आहे़ त्यांच्या रिक्त जागेवर सोलापूर येथील सहायक संचालक आरोग्य सेवा कृष्ठरोग डॉ़ शितलकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे़डॉ़ कमलापूरकर यांच्या कार्यमुक्तीचा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता़ त्या अनुषंगाने चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती़ या समितीने चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविला होता़ नियुक्तीच्या ठिकाणी लवकरच रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत़बाईक अॅम्ब्युलन्सचा यशस्वी प्रयोगडॉ़ शितलकुमार जाधव हे सोलापूर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणूनही कार्यरत होते़ त्यांच्या कार्यकाळात गेल्या तीन वर्षांपासून वारीत येणाऱ्यांसाठी बाईक अॅम्ब्युलन्स ही संकल्पना राबविण्यात आली होती़ आरोग्य सेवकांना आरोग्यदूत म्हणून यात नियुक्ती देऊन वारीत अगदी सहज पोहचून उपचारा देण्यासाठी, आरोग्य सेवादेण्यासाठी त्यांची ही संकल्पना यशस्वी ठरली होती़ हा प्रयोग नंतर मुंबईतही राबविण्यात आला होता़ सरकारच्या आरोग्य सेवांवर सामन्यांचा विश्वास बसणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे, येत्या आठवडाभरात जळगावला रूजू होणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
जळगाव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची अखेर बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:47 PM