जळगाव : जिल्हा रुग्णालयात जागेचा प्रश्न बिकट बनला असून रुग्णांची संख्या वाढल्याने गुरुवारी एका खाटेवर तीन रुग्ण टाकण्याची वेळ आली. दिवसेंदिवस येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून सुविधा नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. प्रसूती कक्षासह इतर कक्षांमध्येही खाटा कमी पडत असल्याने मोहाडी रस्त्यावर उभारण्यात येणाºया महिला रुग्णालयाचे काम लवकर मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयास सुरुवात झाली असली तरी येथे आहे त्या समस्या कायम आहे. येथील जागेचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने येथे खाटा देखील वाढविल्या जात नसल्याचे चित्र आहे. सुरुवातीपासून जिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त जागा, कर्मचाºयांची अरेरावी, औषधींचा तुटवडा अशा विविध अडचणींना रुग्णांना सामोरे जावे लागते.रुग्णांची संख्या वाढल्याने गैरसोयगेल्या महिनाभरापासून थंडी-तापाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने खाजगी रुग्णालयात गर्दी वाढलेली आहे. सोबतच जिल्हाभरातील रुग्ण जिल्हा रुग्णालयात येत असल्याने येथेही जागा कमी पडत आहे. थंडी-तापासह सर्पदंश, विषप्राशनच्या रुग्णांचीही संख्या वाढू लागल्याने विविध कक्षांमध्ये जागा कमी पडत आहे.पुरुषांचा ९ क्रमांकाचा व महिलांच्या १३ क्रमांकाचा कक्ष हा थंडी, ताप, सर्पदंश, विषप्राशनच्या रुग्णांसाठी आहे. हे रुग्ण वाढत असल्याने येथे जागा कमी पडत आहे. त्यामुळे एका खाटेवर तीन रुग्ण टाकले असल्याचे गुरुवारी दिसून आले.गंभीर रुग्णांना प्रथम आपत्कालीन कक्षात दाखल करावे लागते, त्यामुळे तेथेही जागा कमी पडते. आलेल्या प्रत्येक रुग्णावर येथेच उपचार करण्यात यावे, एकही रुग्ण बाहेर जाता कामा नये, अशा सूचना असल्याने रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातच उपचार केले जात असल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येणाºया रुग्णांची संख्या वाढत आहे.दररोज २० ते २५ प्रसूतीजिल्हा रुग्णालयात प्रसूतींची संख्याही वाढली असून दररोज येथे २० ते २५ प्रसूती होत आहेत. त्यात ८ ते १० सिझेरियन असतात. त्यामुळे सामान्य प्रसूती झालेल्या महिलांना दोन दिवसात सुट्टी दिली जाते मात्र सिझेरियन झालेल्या महिलांना किमान सात ते आठ दिवस रुग्णालयात ठेवावे लागते. रुग्णालयातून सुट्टी होणाºया रुग्णांची संख्या कमी व येणाºया रुग्णांची संख्या जास्त असल्याने समस्या वाढत आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात एका सिझेरियन झालेल्या महिलेला परिचारिकेने प्रसूती कक्षातून हाकलून दिल्याने या महिलेला रात्र व्हरांड्यात काढावी लागली होती. गुरुवारीदेखील पाहणी केली असता या कक्षात रुग्णांची संख्या जास्त असल्याने सर्व खाटांवर रुग्ण होते.दररोज सहाशेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचारजिल्हा रुग्णालय ४७२ खाटांचे असून येथे दररोज किमान सहाशेपेक्षा जास्त रुग्ण येतात. त्यांच्यावर येथे उपचार केले जातात व काही जणांना दाखल करून घेतल्यास खाटा कमी पडत असल्याने त्यांचे हाल होतात.३७२ खाटांचे जिल्हा रुग्णालय नंतर ४७२ खाटांचे झाले. त्या पाठोपाठ जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढून रुग्णसेवेवरही परिणाम होऊ लागला आहे. रुग्णालयातील हा वाढता ताण पाहता मोहाडी रस्त्यावर स्वतंत्र महिला व बाल रुग्णालयाचे काम सुरू असून त्याचे काम लवकर मार्गी लागल्यास जिल्हा रुग्णालयातील बराच ताण कमी होणास मदत होणार आहे. महिला व बाल रुग्णांवर त्या रुग्णालयात उपचार झाल्यास जिल्हा रुग्णालयातील हे कक्ष इतर कक्षांसाठी पूरक ठरू शकतील, त्यामुळे मोहाडी रस्त्यावरील रुग्णालयाचे काम लवकर मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.खाटेवर रुग्णांना बसून राहण्याची वेळएका खाटेवर दोन जणांना झोपणे कठीण असताना तीन जण एका खाटेवर टाकावे लागत असल्याने रुग्णांना झोपता येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे रुग्ण अक्षरश: खाटेवर बसून होते. रुग्णांचे नातेवाईक सोबत असल्याने त्यांनाही कक्षात थांबता येत नसल्याचेही चित्र आहे. रुग्णास त्रास असल्यास त्याने काय करावे, खाटेवर बसूनच रहावे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.जिल्हा रुग्णालयात येणाºया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना परत पाठवू शकत नाही, त्यामुळे प्रत्येक रुग्णांवर उपचार करणे गरजेचे आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्याने रुग्णांची संख्या वाढली असून उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.- डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक.
जळगाव जिल्हा रुग्णालयात एकाच खाटेवर तीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:43 AM
रुग्णांचे हाल
ठळक मुद्देजागेचा प्रश्न बनतोय बिकटरुग्णांची संख्या वाढल्याने गैरसोय