जळगाव: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ मधील टप्पा दोनची शिल्लक कामे मुदतवाढ मिळाल्याने मार्च २०१८ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे आवश्यक असताना त्यापैकी १२५ अद्यापही अपूर्णच आहेत. त्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत ५९ तर जि.प. लघुसिंचन विभागांतर्गत ५२ कामांचा समावेश आहे. कृषी विभागातील प्रलंबित कामांमध्ये सर्वाधिक ४९ कामे एरंडोल तालुक्यातील आहेत. तसेच नियोजनानुसार टप्पा ३ची कामे देखील मे २०१८ अखेर पूर्ण करावयाची असल्याने त्यांच्या प्रशासकीय मान्यता मार्च अखेर पूर्ण होणे अपेक्षित असताना मंजुर आराखड्यातील ४२७१ कामांपैकी अद्यापही ६५९ कामांना प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. त्यामुळे या टप्प्याचे कामही लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.शासनाने पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २०१५-१६ मध्ये २३२ गावांमध्ये ही योजना राबविण्यात आली. तर दुसरा टप्पा २०१६-१७ या वर्षात राबविण्यासाठी २२२ गावांची निवड करण्यात आली. तिसºया टप्प्यात २०१७-१८ मध्ये २०६ गावांची निवड या अभियानांतर्गत करण्यात आली. तर आता चौथ्या टप्प्यासाठी २०१८-१९ साठी १६० गावांची निवड करण्यात आली आहे. मात्र अद्यापही टप्पा २ची कामेच अपूर्ण असल्याने योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दुसºया टप्प्यातील १४६ पैकी ९७ कोटीच खर्चदुसºया टप्प्यात मंजूर आरखड्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या अंतर्गत १९३३ कामे, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग जि.प. यांच्या अंतर्गत ५५२, वरिष्ठ भूवैज्ञानिक ४७२, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.प. विभाग (जि.प.) १२३३ कामे, कार्यकारी अभियंता जलसंधारण (स्थानिकस्तर) २५४ कामे, वनविभाग ४१२ अशा ४८५६ कामे प्रस्तावित होती. त्यासाठी १४६ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर होता. ही कामे मार्च २०१७ अखेरच पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र मोठ्या संख्येने कामे निधीची अडचण नसतानाही अपूर्ण राहिल्याने ही कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही तब्बल १२५ कामे मार्च महिना संपण्यास दोन आठवडेच शिल्लक असतानाही अपूर्ण आहेत. मंजूर १४६ कोटींच्या निधीपैकी केवळ ९७ कोटींचा निधीच आतापर्यंत या कामांवर खर्च झाला आहे. उर्वरीत निधी मार्चअखेर खर्च न झाल्यास परत जाणार आहे. कामे अपूर्ण असलेल्या विभागांमध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ५९, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग जि.प. यांच्या अंतर्गत ५२,कार्यकारी अभियंता जलसंधारण (स्थानिकस्तर) १४ यांच्या कामांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या प्रलंबित कामांपैकी एरंडोल विभागाकडील १२८ कामांपैकी ४९ कामे प्रलंबित आहेत. काही कामे सुरूच झालेली नाहीत. एरंडोल विभागातील कृषी विभागाच्या अधिकाºयांना वरिष्ठांकडून वारंवार सूचना देऊनही या कामांना सुरूवात झालेली नाही.
जळगाव जिल्ह्यात जलयुक्त शिवार टप्पा दोनची १२५ कामे राहणार अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:38 AM
जलयुक्त शिवारचा घोळ: निधी वितरीत होऊनही यंत्रणेचे दूर्लक्ष
ठळक मुद्देशिल्लक कामांमध्ये एरंडोल कृषी विभाग, जि.प. लघुसिंचन विभाग आघाडीवर दुसऱ्या टप्प्यातील १४६ कोटींच्या निधीपैकी ९७ कोटीच खर्चटप्पा ३च्या ६५९ कामांना प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी