आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १८ - अपंग युनिटमध्ये बोगस नियुक्तीपत्र देवून सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांचे प्रकरण राज्यात गाजत असताना या बोगसगिरीमध्ये जळगाव जिल्हा आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. या युनिटमधील राज्यातील ५९५ शिक्षकाच्या समायोजनाचे आदेश शासनने दिले असताना एकट्या जळगाव जिल्ह्यातील बोगस नियुक्तीची संख्या २७४ इतकी आढळली आहे.यामुळे जिल्ह्यातील बोगसगिरी सर्वाधिक असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. तर राज्यात आणखी काही जि. प. मध्ये अशा बोगस याद्या गेल्याची शक्यता असून हा आकडा अधिक फुगू शकतो, असे मत जाणकरांमधून व्यक्त होत आहे.जिल्हा परिषद ते मंत्रालय मोठी साखळीराज्यभरातील २३९ युनिटमधील ५९५ शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश २००९ मध्ये अपंग युनिट बंद झाल्यानंतर काही दिवसांनी शासनामार्फत देण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यात आधी १८० व नंतर २०१७ मध्ये ९४ शिक्षकांच्या नियुक्तीची यादी ग्रामविकास विभागाकडून दिली होती. याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविले असता अशी यादी पाठविलीच नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान राज्यातही हा घोटाळा काही ठिकाणी उघडकीस आला. बोगस यादी प्रकरणात जिल्हा परिषद ते मंत्रालय अशी मोठी साखळी असून रॅकेट समोर येण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.समायोजनाचे निघाले आदेशअपंग युनिट बंद पडल्यानंतर राज्यभरातील या युनिटमध्ये काम करणारे शिक्षक एकत्र आले. आपल्या उपजिवेकेच्या प्रश्नी मंत्रालयापर्यंत या शिक्षकांनी दाद मागितली याची दखल घेत शासनाने काही दिवसांमध्येच अध्यादेश काढून या शिक्षकांना समावून घेण्याचा निर्णय दिला.काय आहे अपंग युनिट?जि. प. शाळांमधील अपंग विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुुर्लक्ष होवू नये म्हणून ८ अपंग विद्यार्थ्यांचा एक गट तयार करण्यात येवून त्यांना शिकविण्यासाठी स्वतंत्र शिक्षकाची नेमणूक केली गेली. या शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी अर्थात पूर्ण पगारी म्हणून नियुक्त केले होते.२००९ नंतर बंद केले युनिटहे अपंग युनिट २००९ पर्यंत सुरु होते या नंतर मात्र शासनाने हे युनिट बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या युनिटमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत अनेकांच्या उपजिविकेचा प्रश्न उभा राहिला.
अपंग युनिटच्या ‘बोगसगिरी’त जळगाव जिल्हा अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:30 PM
मोठे रॅकेट उघडकीस येणार
ठळक मुद्देबोगस नियुक्तीचा आकडा जिल्ह्यात सर्वात मोठा२००९ नंतर बंद केले युनिट