जळगाव : नवरात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ होत असून आदिशक्तीच्या स्वागतासाठी जळगावकर सज्ज झाले आहेत. विविध साहित्याच्या खरेदीसाठी शनिवारी मंडळाचे कार्यकर्ते आणि भक्तगणांनी बाजारपेठ फुलली होती. बाजारपेठेत विविध साहित्यांची दुकाने थाटण्यात आली असून तेथे खरेदीसाठी उत्साह दिसून येत होता. या ठिकाणी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी झाली होती. संध्याकाळी त्यात आणखी भर पडली.बाजारात आलेल्या वस्तू व त्यांचे दर असेघट- घटस्थापनेत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे घट होय. बाजारात लहान-मोठ्या आकारात घट दाखल झाले असून त्यांची किंमत ५० ते १०० रुपये प्रती नग आहे. विशेष म्हणजे घट विविध रंगातदेखील आले आहेत. गुजराती बांधव जे घट स्थापन करतात त्यासाठी रंगीत घट वापरले जातात. त्यांना गरबा असे म्हटले जाते. काही मंडळ मोठे घट घेतात. या सोबतच मातीची धूपदाणी, दिवा या वस्तूही दाखल झाल्या आहेत.टोपली- घट ज्यामध्ये स्थापन केला जातो त्या टोपलीचे भावदेखील चांगलेच वधारले आहे. या टोपल्यादेखील ४० ते ६० रुपये प्रती नग आहे. एरव्ही टोपली व केरसुणीचे भाव कमी असतात, मात्र नवरात्रीपासूनच त्यांचे भाव वाढू लागतात.लाल मदरा- लाल मदरा व त्यासोबत चमकीची झालर असलेले कापडदेखील बाजारात आले असून ते १० ते १५ रुपये प्रती नगपासून पुढे उपलब्ध आहे.नारळ- नारळाचे भाव २० रुपये प्रती नग झाले असून नारळ फोडण्यासह ते अर्पण करण्यासाठीदेखील अनेक जण खरेदी करीत होते.घटाची तयार पूजा- पूजेसाठी लागणाऱ्या घटाच्या पूजेचे साहित्य एकसोबतच मिळत असून प्रत्येक वस्तू वेगवेगळी खरेदी करण्याचा वेळ वाचत आहे. यामध्ये बांगड्या, टिकली, फणी, सात धान्य, काळे मणी, हळदी, कुंकू, गुलाल, शेंदूर असे एकूण १३ वेगवेगळ््या वस्तू आहे.पाच फळे- पूजेसाठी लागणाºया वेगवेगळ््या पाच फळांची अनेक दुकाने लागली असून ३० रुपयांना पाच फळ मिळत आहे. यामध्ये सफरचंद, चिकू, केळी, डाळींब, आवळा, सीताफळ यांचा समावेश आहे.झेंडूची फुले ६० ते ८० रुपये किलोदेवीला हार आणि पूजेसाठी आवश्यकता असते ती फुलांची. बाजारात झेंडूचे फुल मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून त्याचे होलसेलचे भाव ४० ते ५० रुपये प्रती किलो असून किरकोळ दर ६० ते ८० रुपये किलो आहे. तालुक्यातील शिरसोलीसह कन्नड, बुलडाणा, धुळे जिल्ह्यातील मुकटी, येथून झेंडूची फुले शहरात येत आहे. या सोबतच शहर परिसरातील पिंप्राळा येथूनही काही प्रमाणात झेंडूची फुले येत आहे. या दिवसात कलकत्ता प्रकारच्या झेंडू फुलांना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. झेंडूसोबत शेवंतीच्या फुलांनादेखील चांगली मागणी आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दररोज नऊ दिवस फुलांचे हार व फुले मिळाले पाहिजे, यासाठी अनेकांनी शहरातील फुले विक्रेत्यांकडे आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे.नागवेलीची पान ४० ते ५० रुपये शेकडापूजेमध्ये नागवेलीच्या पानांनादेखील महत्त्व असल्याने त्यांचीही मोठ्या प्रमाणात बाजारात आवक असून ४० ते ५० रुपये प्रती शेकडा ते विक्री होत आहे.मूर्ती खरेदीसाठी आज गर्दी होणारशनिवारी अमावस्या असल्याने अनेकांनी मूर्ती घेणे टाळले. अमावस्या टाळून अनेकजण रविवारी सकाळीच मूर्ती खरेदी करणार असल्याने मूर्ती बाजारात आज काहीशी शांतता होती.पूजेचे विविध साहित्यसुटे कुंकू १६० रुपये प्रति किलो असून कापूर, कापूस वात, हिरव्या बांगड्या, हळद, गुलाल, शेंदूर, सुपारी, खारीक, बदाम, काजळ, टिकली, छोटे गोल आरसे, रंगीत नाडा असे विविध साहित्य उपलब्ध आहे. काळ््या उसांनादेखील मागणी असून या सर्व साहित्यांची एक दिवस आधीच खरेदी करण्याकडे अनेकांना कल होता.घरगुती स्थापनेसाठी लहान मूर्तीघरी देवीची स्थापना करण्यासाठी लहान मूर्तीदेखील बाजारात आलेल्या आहे. विविध रुपातील लहान मोठ्या मूर्ती २०० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध असून साडेतीन फुटापर्यंतची मूर्ती १००० ते १२०० रुपयांना आहे.
जळगाव जिल्ह्यात घटस्थापनेसाठी लगबग, आदिशक्तीच्या स्वागतासाठी बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:25 PM