जळगाव- जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.)च्या विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांची वर्षभराची मुदत आॅक्टोबरमध्येच संपली असल्याने रविवार, दि. १९ रोजी सकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष, व उपाध्यक्षांनी पदांचे राजीनामे सहकारगटाचे नेते बी.बी. पाटील यांच्याकडे सोपविले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांकडून फिल्डींग लावण्यास प्रारंभ झाला आहे. अध्यक्ष तुकाराम बोरोले, उपाध्यक्ष महेश पाटील यांचा कार्यकाल १ वर्षांचा होता. तो आॅक्टोबरमध्येच संपला होता. मात्र त्यांच्या कार्यकाळातच भुसावळ येथील संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्याचे ठरल्याने त्यांचा कार्यकाळ मुदत संपूनही सुरू ठेवण्यात आला होता. रविवार दि.१९ रोजी या इमारतीचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी सकाळी संचालकमंडळाची बैठक झाली. त्यात अध्यक्ष व उपाध्यक्षांनी राजीनामे सोपविले. ते सोमवार, दि.२० रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे सोपविले जाणार आहेत. अध्यक्षपदासाठी सहकार गटाचे गटनेते उदय पाटील, तसेच सुनील निंबा पाटील, सुभाष जाधव आदींची नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी आणखीही नावे समोर येण्याची शक्यता आहे. मात्र अध्यक्षपदाबाबतचा निर्णय सहकारगटाचे नेते बी.बी. पाटील हेच घेणार आहेत. त्यांना याबाबत विचारणा केली असता डीडीआर निवडणुकीची तारीख जाहीर करतील. त्या निवडणुकीच्या दिवशी तासभर आधी नावे निश्चित केली जातील, असे सांगितले. सध्या सर्व २१ सदस्य सहकार गटात असल्याने विरोधी लोकशाही व लोकमान्य पॅनलकडूनही हालचाली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तिघांची नावे चर्चेतअध्यक्षपदासाठी सहकार गटाचे गटनेते उदय पाटील, तसेच सुनील निंबा पाटील, सुभाष जाधव आदींची नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी आणखीही नावे समोर येण्याची शक्यता आहे. तर या दोन पदांपैकी एक पद शिक्षक प्रतिनिधीला मिळावे, अशी मागणी काही संचालकांनी केली आहे.
जळगाव जिल्हा ग.स. सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अखेर राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 5:32 PM
संचालक मंडळाची बैठक: उमेदवाराबाबत चाचपणी सुरू
ठळक मुद्देराजीनामे सहकारगटाचे नेते बी.बी. पाटील यांच्याकडे सोपविलेअध्यक्ष तुकाराम बोरोले, उपाध्यक्ष महेश पाटील यांचा कार्यकाल संपलानिवडणुकीच्या दिवशी तासभर आधी नावे निश्चित केली जातील