शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

जळगाव जिल्ह्यात पावसाने पाच तालुक्यात ओलांडली ५० टक्क्यांची सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:13 PM

अद्यापही ७ मध्यम प्रकल्पात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा

जळगाव : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाने तब्बल २३ दिवस उशीराने हजेरी लावूनही पावसाने सलग व जोरदार हजेरी लावत मागील वर्षीची आजपर्यंतची सरासरी ओलांडली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असले तरीही अद्यापही जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.५ तालुक्यांनी ओलांडली सरासरीची पन्नाशीमागील वर्षी आजच्या तारखेला जिल्ह्यात सरासरी ३८.९ मिमी पाऊस झाला होता. मात्र यंदा पावसाचे आगमन उशीरा होऊनही जोरदार हजेरी लावल्याने पावसाने ही सरासरी ओलांडली असून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ४७.४ टक्के पाऊस झाला आहे. जामनेर तालुक्यात सर्वाधिक ६५.४ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस या तालुक्यात झाला होता. तर एरंडोल ५३.४ टक्के, भुसावळ ५१.२, मुक्ताईनगर ५७.०० टक्के तर पाचोरा तालुक्यात ५०.२ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरीत सर्व तालुक्यात ३९ टक्क्यांच्यावर पाऊस झाला आहे. जळगाव तालुक्यात ४२.९ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी केवळ ३६.६ टक्के पाऊस झाला होता.एकाच दिवसांत २५ मिमी पाऊसजळगाव तालुक्यात शनिवारी दिवसभर व रात्रीतून २४.९ मिमी पाऊस झाला. तर धरणगावला ३१.१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १० मिमी पाऊस एका दिवसांत झाला. मात्र चाळीसगाव, बोदवड तालुका मात्र काल कोरडा होता.मध्यम प्रकल्पांची अवस्था बिकटमात्र दुसरीकडे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची अवस्था मात्र बिकट आहे. १३ मध्यम प्रकल्पांपैकी ७ मध्यम प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यात बहुळा मध्ये ०.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर अग्नावती, हिवरा, अंजनी, भोकरबारी, बोरी, मन्याड या धरणांमध्ये आजही शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उर्वरीत प्रकल्पांमध्ये सरासरी १८.७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. तर ९६ लघु प्रकल्पांमध्ये ७.९७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.पावसामुळे पिकांना फायदागेल्या आठवडाभरापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना फायदाच होणार आहे. मात्र शेतात पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी मात्र शेतकऱ्यांनी घ्यावी. अन्यथा पिक पिवळे पडण्याची भिती आहे. त्यामुळे पाणी तुंबणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कपाशी लागवडीला जेमतेम महिना-दीड महिना झाला आहे. तसेच उडीद-मूगही वाढीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्यावरील कीड पावसामुळे वाहून जाणार असल्याचे सांगितले.मोठ्या प्रकल्पांमध्ये वाढतोय पाणीसाठाहतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांवर जिल्ह्यातील अनेक शहरांसह गावांचाही पाणीपुरवठा अवलंबून आहे. या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा मे अखेरीस शून्य टक्क्यांवर पोहोचला होता. तर वाघूरमध्ये जेमतेम ९ टक्के पाणीसाठा उरला होता. मात्र या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे या मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे हतनूरमध्यये १९.१४ टक्के, गिरणा १२.८२ टक्के तर वाघूरमध्ये २९.८६ टक्के असा एकूण सरासरी १८.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट मोठ्या प्रमाणावर दूर झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव