लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपर्यंत एकूण ८२.२ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस ६६.५ टक्के आहे. यंदा जून अर्धा उलटला तरी जिल्ह्यातील पावसाने सरासरी गाठलेली नाही. यंदा जून महिन्यात जिल्ह्यात फक्त १० दिवसच पाऊस झाला आहे आणि तो देखील तुरळक म्हणावा एवढाच आहे. यात सर्वाधिक पाऊस हा पारोळा तालुक्यात १२६. ५ मिमी एवढा झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस हा चोपडा तालुक्यात ४१.३ मिमी एवढाच झाला आहे.
तालुका झालेला पाऊस मिमीमध्ये
(२२ जूनपर्यंत झालेला पाऊस)
जळगाव ८७.२
भुसावळ ९४.४
यावल ९६.५
रावेर ६९.४
मुक्ताईनगर ५५.८
अमळनेर ४६.९
चोपडा ४१.३
एरंडोल ६६.९
पारोळा १२६.५
चाळीसगाव ११९.७
जामनेर ९५.३
पाचोरा ८१.७
भडगाव ८३.३
धरणगाव ९९.०
बोदवड ६७.७
जळगाव जिल्हा एकूण पाऊस ८२.२