शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

जळगाव जिल्ह्यात धरणांचे पाणी आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:56 PM

जिल्हाधिका-यांची परवानगी बंधनकारक

जळगाव : जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणी आरक्षण जाहीर करण्यात आले असून प्रत्येक धरणात शिल्लक साठा व त्याचे नियोजन करीत पाणी सोडावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत.गिरणा धरणात २६ सप्टेंबर रोजी ८८८८ दलघफु पाणीसाठा होता. त्यापैकी ७२१४ दलघफु अर्थात ९५ टक्के पाणी आरक्षित केले आहे. मन्याड धरणात जिवंत साठा नसल्याने मृतसाठ्यावर आरक्षण दिले आहे. २७८.९७ दलघफु असलेला १८ टक्के साठा आरक्षित केला आहे. सोबतच बोरी ४६८.६४ दलघफु, हतनूर धरणात ९००५.३३ दलघफु पाणी साठा आहे. त्यापैकी औद्योगिक साठी १५८८.७६ दलघफू, सावादा, भुसावळ, रावेर, यावल, धरणगाव, अमळनेर, चोपडा या नगर परिषदसाठी २१२३.६२ दलघफू आरक्षित, ग्रामीणसाठी ३९८.५० असा एकूण ४११०.८८ दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. वाघूर धरणात ४१९१.३५ दलघफु पाणी साठा आहे. या पैकी १५९२.२५ दलघफू पाणीसाठा आरक्षित केला आहे. गुळ धरणात ६९३.१३ दलघफू पैकी ५२३.३५ दलघफू, बहुळा धरणात पाणी नाही. त्यावर पाचोरा नगर परिषदसह १७ गावे अवलंबून आहे. हिवरा धरणात ११६.८९ दलघफूपैकी १३.२४ दलघफू, तोंडापूर धरणात ८.४८ दलघफूपैकी ५.९३, अग्नावती धरणात ६६.७५ दलघफूपैकी ७.९४ दलघफू, सुकी धरणात १४०७.३० दलघफूपैकी ४५.१६ दलघफू, अंजनी धरणात ८२.०३ दलघफूपैकी ३७.५० दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे भोकरबारी धरणात मात्र पाणीसाठाच नाही.प्रत्येक महिन्याच्या शेवटी धरणात किती साठा शिल्लक आहे त्याचे नियोजन करावे व त्यानुसार पाणी सोडावे अशा सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित खात्यांना दिलेल्या आहेत.जिल्हाधिका-यांची परवानगी बंधनकारकजिल्ह्यात सध्या दुष्काळाची भीषण स्थिती असून १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. भविष्यातील टंचाई लक्षात प्रकल्प व धरणातील पाणी सोडण्यापूर्वी जिल्हाधिकाºयांची परवानगी बंधनकारक असून कुठल्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी सिंचनासाठी देता येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव