आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१५ : अंगणवाड्यांच्या फेब्रिकेटेड खोल्यांसाठीचा ५ कोटींचा निधी दोन दिवसांपूर्वीच परत गेला. यामुळे १०० ठिकाणच्या अंगणवाड्या खोल्यांचा प्रश्न कायम राहिला आहे.अनेक ठिकाणी अंगणवाड्यांना स्वत:च्या खोल्या नसल्याने कोठे उघड्यावर, तर कोठे वºहांड्यात अशा रीतीने अंगणवाड्या भरविल्या जात आहेत. ही बाब लक्षात घेता शासनाने १०० फेब्रिकेटेड अंगणवाडी खोल्यांसाठी ५ कोटींचा निधी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाला दिला होता. मात्र काही सदस्यांनी आपल्याकडील तापमान पाहता या फेब्रिकेडेट अर्थात लोखंडी खोल्या योग्य ठरणार नाही. ही बाब लक्षात घेता बांंधकाम करून खोल्या उभाराव्यात, अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडे बांंधकाम करून खोल्या उभारण्यासाठीची परवानगी मागण्यात आली. परंतु शासनाकडून यासंदर्भात उत्तरच आले नाही. शेवटी निधी खर्च करण्याची मुदत संपल्याने शासनाला हा निधी परत करावा लागला.