जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी राबविलेल्या धाडसत्रात सत्रासेन, ता.चोपडा येथे सव्वा लाख रुपये किमतीची विविध प्रकारची अवैध दारु पकडली. लिलाधर पंडीत कोळी व अंकलेश प्रताप कोळी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विभागीय उपायुक्त अ.ना.ओहोळ यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन दिवसापासून मोहीम तीव्र केली आहे. चोपडा तालुक्यात अवैध दारुची माहिती मिळाल्यानंतर अधीक्षक सी.पी.निकम यांनी निरीक्षक संजय कोल्हे, नरेंद्र दहिवडे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील, आनंद पाटील, सत्यविजय ठेंगडे, स्वाती इंगळे, वैशाली धुरंधर, सहायक दुय्यम निरीक्षक डी.बी. पाटील, रघुनाथ सोनवणे, कुणाल सोनवणे, अमोल पाटील व भूषण परदेशी यांचे पथक तातडीने रवाना केले. वैजापूर येथे गेल्यावर या पथकाला लिलाधर व अंकलेश यांच्याजवळ देशी दारुचे २७ खोके, विदेशी दारुचा १ खोका, बियरचे २० खोके, गावठी दारु १६० लीटर व मोहाची फुले १३ गोण्या आढळल्या.दारूच्या भट्टया उद्ध्वस्तएमआयडीसी पोलिसांनी शनिवारी सिंगापुर कंजरवाडा व मोहाडी रस्त्यावर गावठी दारुच्या भट्टा उद्ध्वस्त केल्या. बबलुबाई कंजर हिच्या भट्टीवर कच्चे रसायन व दारु मिळून १ लाख २० हजार १०० रुपयांची माल उद्ध्वस्त करण्यात आला तर सुषमा रंधे बाटुंगे हिच्या भट्टीवर १ लाख ३० हजार ८०० रुपयांचा माल नष्ट करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात सव्वा लाखाची अवैध दारु पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:44 AM